Last Updated: 29 March 2026
RCCB Information In Marathi: घरात किंवा ऑफिसमध्ये Electrical Safety खूप महत्त्वाची असते. छोटासा Current leakage झाला तरी Current बसु शकतो. म्हणूनच RCCB (Residual Current Circuit Breaker) हे Safety Device महत्त्वाचं आहे. पण RCCB म्हणजे नेमकं काय? ते कसं काम करतं? आणि त्याचे किती प्रकार असतात? हे खूप लोकांना माहित नसतं.
Types of Residual Current Circuit Breaker In Marathi या ब्लॉगमध्ये आपण RCCB बद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहे. RCCB म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते, प्रत्येक प्रकार कधी वापरला जातो आणि घरात किंवा इमारतीत योग्य RCCB कसा निवडायचा हे सगळं या ब्लॉगमध्ये स्पष्टपणे समजेल. Electrical knowledge जरी तुमचे कमी असले तरीही तुम्हाला हा विषय सहज समजेल.
Tip: हा लेख 29 मार्च 2026 मध्ये अपडेट करण्यात आला असून, यामध्ये नवीन technology आणि real-life उदाहरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.
Table of Contents
Types of Residual Current Circuit Breaker In Marathi
RCCB (Residual Current Circuit Breaker) हा एक safety device आहे जो electrical Current leakage झाला की supply बंद करतो आणि आपल्याला electric shock पासून वाचवतो. RCCB चे वेगवेगळे प्रकार आहेत. काही leakage च्या waveform नुसार ठरतात, तर काही wiring system आणि power connection नुसार. त्यामुळे योग्य RCCB type समजून घेणं खूप गरजेचं आहे. RCCB normal condition मध्ये steady current flow होत असताना काहीही action घेत नाही, पण जेव्हा leakage मुळे current imbalance होतो तेव्हा लगेच trip होतो.
RCCB Types by Detectable Waveform In Marathi
या मध्ये RCCB कोणत्या प्रकारचा leakage current detect करू शकतो हे चेक केल जात. आजकाल घरात आणि industry मध्ये वेगवेगळी electronic devices वापरली जातात, त्यामुळे leakage चे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात.
Type AC RCCB
हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा RCCB आहे. हा फक्त AC leakage detect करतो. घरातले fan, light, heater यांसारख्या simple appliances साठी हा वापरला जातो. जर घरात फार advanced electronic devices नसतील तर हा RCCB उपयोगी ठरतो.
Type A RCCB
हा RCCB Type AC पेक्षा जास्त safe मानला जातो. हा AC leakage सोबत pulsating DC leakage सुद्धा detect करतो. आजकाल washing machine, computer, inverter यांसारखी electronic devices वापरली जातात, हा RCCB त्या डिवाईसला leakage Current पासून Safe ठेवण्याचे काम करतो.
Type B RCCB
हा खूप advanced आणि sensitive RCCB आहे. हा AC, pulsating DC आणि smooth DC leakage सगळं detect करू शकतो. Solar system, EV charging, heavy machines किंवा industry मध्ये याचा जास्त वापर होतो. हा महाग असतो पण protection खूप high level चं देतो.
Type F RCCB
हा modern appliances साठी बनवलेला RCCB आहे. Variable speed motor, inverter AC, advanced electronic machines यामुळे होणारा complex leakage detect करण्यासाठी हा वापरला जातो. Commercial buildings किंवा smart homes मध्ये RCCB चा वापर केला जातो.
RCCB Types by Number of Poles In Marathi
RCCB किती wires किंवा किती phases control करतो हे Poles Types मध्ये ठरवलं जात. म्हणजे RCCB किती connection protect करू शकतो हे यातून ठरतं.
Two Pole RCCB
हा Two Pole RCCB single phase connection साठी वापरला जातो. घरामध्ये phase आणि neutral या दोन wires असतात, त्यामुळे Two pole RCCB वापरला जातो. हा घरासाठी सर्वात common RCCB आहे.
Four Pole RCCB
हा three phase connection साठी वापरला जातो. यात 3 phase आणि 1 neutral असे चार wires असतात. मोठे buildings, factories, commercial places किंवा heavy load असलेल्या ठिकाणी Four pole RCCB वापरला जातो.
RCCB म्हणजे काय?
RCCB (Residual Current Circuit Breaker) हे एक Electrical Safety Device आहे जे घर इमारतीमध्ये current leakage झाला की लगेच power supply बंद करतं. त्यामुळे electric shock, short circuit किंवा आग लागण्याचा धोका कमी होतो.
सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा wiring किंवा appliance मधून current चुकीच्या मार्गाने बाहेर जातो (leak होतो), तेव्हा RCCB ते ओळखतं आणि काही सेकंदातच electricity cut करतं. त्यामुळे shock बसण्याचा धोका कमी होतो. RCCB leakage current पासून protection देतो, पण overload आणि short circuit protection साठी MCCB (Molded Case Circuit Breaker) खूप महत्त्वाचा असतो. MCCB बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी MCCB म्हणजे काय हे article नक्की वाचा.
RCCB कसा काम करतो?
RCCB चे काम खूप Basics principle वरती चालतं जितका current आत जातो, तितकाच current बाहेर यायला हवा. जर यात थोडाही फरक दिसला, तर RCCB लगेच supply बंद करतो.
घरात electricity phase वायरने आत जाते आणि neutral वायरने परत बाहेर येते. RCCB सतत या दोन्ही वायरमधला current मोजत असतो. जर दोन्ही current सारखे असतील तर सगळं ठीक आहे असं समजलं जातं. पण जर wiring खराब असेल, appliance मध्ये fault असेल किंवा कुणाला shock बसत असेल तर काही current बाहेर leak होतो. त्यामुळे phase आणि neutral मधला current equal राहत नाही.
हा imbalance RCCB लगेच ओळखतो आणि काही milliseconds मध्येच power supply बंद करतो. त्यामुळे electric shock, आग किंवा मोठा अपघात टळतो. RCCB Working Principles बद्दल सविस्तर माहिती तुम्ही लिंक वरती क्लिक करून वाचू शकता.
Real Life Example of RCCB in Marathi
RCCB म्हणजे Residual Current Circuit Breaker हा एक safety device आहे जो electrical leakage current detect करून लगेच supply बंद करतो. यामुळे shock, fire आणि equipment damage टाळता येतो. चला आता आपण RCCB चे काही real life examples अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ.
घरामध्ये RCCB चा वापर
घरात RCCB leakage current detect करून लगेच supply बंद करतो. जर washing machine किंवा geyser मध्ये fault झाला आणि body ला current आला, तर RCCB लगेच trip होऊन electric shock पासून protection देतो.
Office / Commercial Building
Office मध्ये computers आणि servers सतत चालू असतात. RCCB leakage detect करून power cut करतो, ज्यामुळे equipment damage आणि fire hazard टाळले जातात.
Industrial Area (Factories)
Factories मध्ये RCCB worker safety साठी खूप महत्त्वाचा आहे. मशीनमध्ये leakage झाला तर RCCB लगेच trip होतो आणि मोठा accident होण्यापासून बचाव करतो.
Bathroom / Wet Areas
Bathroom सारख्या ठिकाणी पाण्यामुळे shock चा धोका जास्त असतो. Geyser मध्ये leakage झाला तर RCCB लगेच supply बंद करून protection देतो.
Outdoor Electrical Systems
Outdoor wiring किंवा pumps मध्ये पावसामुळे leakage होऊ शकतो. RCCB लगेच fault detect करून power cut करतो आणि shock व short circuit टाळतो.
Residual Current Circuit Breaker Construction
Residual Current Circuit Breaker (RCCB) हा electrical safety साठी खूप महत्त्वाचा device आहे. याची रचना (construction) अशी केलेली असते की earth leakage किंवा fault current detect झाला की लगेच supply cut होते. खाली RCCB चे मुख्य components आणि त्यांचे काम समजावून सांगितले आहे. Electrical faults आणि protection concepts समजून घेण्यासाठी “Circuit Breaker in Marathi” हा basic guide वाचा.
1. Core Balance Current Transformer (CBCT)
RCCB मधील CBCT हा सर्वात महत्त्वाचा component आहे. यातून phase (live) आणि neutral दोन्ही wires pass होतात. Normal condition मध्ये दोन्ही current equal असतात, त्यामुळे कोणताही magnetic effect तयार होत नाही. पण जेव्हा leakage current earth कडे जातो, तेव्हा phase आणि neutral मध्ये imbalance तयार होतो. हा imbalance CBCT लगेच detect करतो आणि पुढील process सुरू करतो. त्यामुळे CBCT ला RCCB चा मुख्य sensing part किंवा “brain” असे म्हणतात.
2. Sensing Coil (Relay Coil)
CBCT सोबत जोडलेली sensing coil leakage current detect करण्याचे काम करते. जेव्हा CBCT imbalance ओळखतो, तेव्हा तो signal sensing coil ला देतो. ही coil लगेच energize होते आणि relay mechanism activate करते. साध्या भाषेत सांगायचे तर, sensing coil fault detect झाल्यावर RCCB ला action घ्यायला trigger देते.
3. Trip Mechanism
Trip mechanism हा RCCB चा action घेणारा भाग आहे. Sensing coil कडून signal मिळाल्यानंतर trip mechanism लगेच activate होतो आणि internal contacts open करतो. यामुळे electrical supply तत्काळ बंद होते. हा process milliseconds मध्ये होतो, त्यामुळे user ला electric shock होण्यापासून किंवा wiring मध्ये आग लागण्यापासून protection मिळते.
4. Switching Contacts
Switching contacts हे RCCB मधील current flow control करणारे parts आहेत. Normal condition मध्ये हे contacts closed असतात आणि current सहजपणे flow होतो. पण जसेच fault detect होतो, trip mechanism हे contacts open करतो आणि circuit break करतो. त्यामुळे supply लगेच बंद होते आणि system सुरक्षित राहतो.
5. Test Button
RCCB मध्ये दिलेला test button हा user साठी खूप useful feature आहे. या button च्या मदतीने आपण RCCB योग्य प्रकारे काम करत आहे की नाही हे manually check करू शकतो. Button दाबल्यावर RCCB मध्ये artificially leakage current तयार केला जातो आणि device trip होतो. जर RCCB trip झाला, तर तो व्यवस्थित काम करत आहे असे समजते. त्यामुळे वेळोवेळी test करणे खूप आवश्यक आहे.
6. Enclosure (Outer Body)
RCCB ची बाहेरील body insulating material पासून बनलेली असते, ज्यामुळे user ला direct contact पासून protection मिळते. ही enclosure internal components ला dust, moisture आणि physical damage पासून सुरक्षित ठेवते. तसेच RCCB ची durability आणि safety वाढवण्यामध्ये enclosure महत्त्वाची भूमिका बजावते.
Difference Between MCCB And RCCB
| Feature | MCCB (Molded Case Circuit Breaker) | RCCB (Residual Current Circuit Breaker) |
|---|---|---|
| Main Function | Protects electrical circuits from overload and short circuit | Protects people from electric shock caused by current leakage |
| Working Principle | Trips when current exceeds safe limit (overcurrent protection) | Trips when there is an imbalance between phase and neutral (leakage protection) |
| Protection Type | Equipment and wiring protection | Human safety and shock protection |
| Detects Leakage Current | No | Yes |
| Detects Overload | Yes | No |
| Detects Short Circuit | Yes | No |
| Typical Use | Industrial panels, heavy load systems, large buildings | Homes, offices, and places where human safety is important |
| Current Rating | High current capacity (up to thousands of amps) | Lower current capacity (commonly 25A to 100A) |
| Sensitivity | Less sensitive to small leakage | Highly sensitive to small leakage (like 30mA) |
| Cost | Usually more expensive (depends on rating) | Generally less expensive |
| Main Purpose | Protect electrical system and equipment | Protect human life from electric shock |
घरासाठी कोणत्या sensitivity चा RCCB best असतो?
घरासाठी 30mA sensitivity असलेला RCCB सर्वात Best आणि सुरक्षित मानला जातो. कारण हा थोडस पन current leakage ओळखतो आणि लगेच electricity बंद करतो. त्यामुळे electric shock बसण्याची शक्यता खूप कमी होते.
RCCB चे connection कशे आसते?
Main supply मधून येणारी phase आणि neutral वायर आधी RCCB च्या input ला जोडली जाते, आणि RCCB च्या output मधून त्या पुढे घराच्या wiring किंवा distribution board ला दिल्या जातात. म्हणजे वीज आधी RCCB मधून जाते आणि मग घरात येते, त्यामुळे कुठेही current leakage झाला तर RCCB लगेच supply बंद करतो.
RCCB सारखा trip होत असेल तर काय कारण असू शकतं?
RCCB सारखा वारंवार trip होत असेल तर कुठेतरी current leakage होत असेल. Wiring खराब असणं, एखादं appliance fault मध्ये असणं, ओलावा (moisture) किंवा earthing योग्य नसणं ही मुख्य कारणं असू शकतात. कधी कधी जास्त appliances एकाच वेळी चालू असले तरी imbalance होऊन RCCB trip होतो. अशावेळी wiring आणि appliances electrician कडून तपासून घ्याव.
Conclusion
या ब्लॉगमध्ये आपण RCCB म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते हे या टॉपिकवरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. Waveform नुसार Type AC, Type A, Type B आणि Type F RCCB कशासाठी वापरले जातात हे पाहिलं, तसेच connection नुसार Two pole आणि Four pole RCCB मधला फरकही समजून घेतला.
योग्य ठिकाणी योग्य प्रकारचा RCCB वापरला तर electric shock आणि leakage मुळे होणारे अपघात सहज टाळता येतात. त्यामुळे electrical safety साठी RCCB ची माहिती असणं आणि योग्य निवड करणं खूप महत्वाचं आहे.










