Electrical Power Information in Marathi: Electrical system बद्दल आपण रोज ऐकतो, पण प्रत्यक्षात electricity मधील power चे वेगवेगळे प्रकार काय असतात हे अनेकांना माहिती नसते. घरात fan, AC, mixer किंवा industry मध्ये motor, transformer चालताना नेमकी कोणती power वापरली जाते? kW, kVAR आणि kVA म्हणजे काय? आणि हे सगळं एकमेकांशी कसं related असतं?
या blog मध्ये आपण Type of Electrical Power in Marathi, Electrical Power in Marathi Electrical, Electrical Power Information in Marathi, Power म्हणजे काय, Active Power, Reactive Power आणि Apparent Power यांचा फरक काय आहे या विषयांची सविस्तर माहिती घेणार आहे. power triangle कसा काम करतो, तसेच practical life मध्ये याचा उपयोग कसा होतो हे सगळं step by step समजून घेऊ.
Table of Contents
Type of Electrical Power in Marathi
Electricity वापरताना आपण फक्त device चालत आहे हे पाहतो, पण प्रत्यक्षात electrical system मध्ये power चे वेगवेगळे प्रकार एकत्र काम करत असतात. त्यामध्ये Active Power, Reactive Power आणि Apparent Power हे तीन प्रकार असतात आणि त्यांचा संबंध समजण्यासाठी Power Triangle वापरला जातो. खाली आपण Electrical Power in Marathi आणी Type of Electrical Power in Marathi यांचे तीन प्रकार याबद्दल माहिती पाहनार आहे.
1. Active Power (kW) म्हणजे काय?
Active Power (kW) म्हणजे electrical system मध्ये प्रत्यक्ष काम करणारी power. हीच power electrical energy ला useful work मध्ये convert करते, जसं की bulb प्रकाश देतो, heater उष्णता तयार करतो किंवा motor फिरते. म्हणजेच जी power आपण प्रत्यक्ष वापरतो आणि ज्यामुळे device काम करतं ती Active Power असते.
Active Power ला Real Power किंवा True Power असंही म्हणतात आणि तिची unit kilowatt (kW) आहे. आपल्या घराच्या electricity bill मध्ये जे units मोजले जातात ते Active Power वर आधारित असतात, कारण हीच power प्रत्यक्ष energy consumption दाखवते.
Formula:
Single Phase:
Three Phase:
2. Reactive Power (kVAR) म्हणजे काय?
Reactive Power (kVAR) म्हणजे electrical system मध्ये प्रत्यक्ष काम न करता system व्यवस्थित चालण्यासाठी मदत करणारी power. ही power magnetic field तयार करण्यासाठी वापरली जाते, जी motor, transformer, fan सारख्या inductive devices चालण्यासाठी आवश्यक असते. म्हणजेच Reactive Power मुळे device थेट output देत नाही, पण device चालण्याची प्रक्रिया शक्य होते. या विषयावर Capacitor Kay Kaam Karto? या ब्लॉग मध्ये संपुर्ण माहिती तुम्हाला भेटेल.
Reactive Power ला Wattless Power असेही म्हणतात कारण ही power energy मध्ये convert होत नाही. Reactive Power ची unit kilovolt-ampere reactive (kVAR) आहे. जर system मध्ये Reactive Power जास्त असेल तर power factor कमी होतो, त्यामुळे efficiency कमी होते आणि industry मध्ये capacitor bank वापरून Reactive Power control केली जाते.
Formula:
Or
3. Apparent Power (kVA) म्हणजे काय?
Apparent Power (kVA) म्हणजे electrical system मध्ये supply होणारी एकूण power (total power). ही power म्हणजे Active Power (जी प्रत्यक्ष काम करते) आणि Reactive Power (जी system चालण्यासाठी मदत करते) या दोन्हींचा मिळून बनलेला परिणाम असतो. म्हणजेच electrical supply मधून device ला जी पूर्ण power मिळते तिला Apparent Power म्हणतात.
याची unit kilovolt-ampere (kVA) आहे. Transformer आणि generator ची rating नेहमी kVA मध्ये दिली जाते, कारण त्यांना system मधील total load handle करावा लागतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, electrical system मध्ये वापरली जाणारी एकूण उपलब्ध power म्हणजे Apparent Power.
Formula:
Single Phase:
Three Phase:
Or
4. Power Triangle म्हणजे काय?

Power Triangle म्हणजे electrical system मध्ये असलेल्या Active Power (kW), Reactive Power (kVAR) आणि Apparent Power (kVA) यांच्यातील संबंध समजावून सांगणारा एक right-angle triangle. या triangle base वर Active Power, vertical side वर Reactive Power आणि hypotenuse वर Apparent Power दाखवली जाते. यामुळे system मधील total power कशी विभागली आहे आणि power factor किती आहे हे समजायला सोपं होतं.
Power Triangle च्या मदतीने kVA² = kW² + kVAR² हा संबंध स्पष्ट होतो आणि electrical system ची efficiency कशी आहे हेही समजते. सोप्या भाषेत सांगायचं तर, electrical power चे तीन प्रकार एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे visual पद्धतीने दाखवणारा triangle म्हणजे Power Triangle.
Main Relation:
Power Factor relation:
Information About Power Factor In Marathi
Electrical system मध्ये Power Factor (PF) हा खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण तो system किती efficiently power वापरतो हे दाखवतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, supply झालेल्या total power मधून प्रत्यक्ष कामासाठी किती power वापरली जाते याचं ratio म्हणजे Power Factor.
म्हणजेच electrical system मध्ये दोन प्रकारच्या power असतात Active Power (जी काम करते) आणि Apparent Power (total power). Active Power जितकी जास्त आणि total power च्या जवळ असेल तितका Power Factor चांगला समजला जातो. Electrical Power in Marathi या विषयावर आपण डीटेल मधे माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला Power Factor बद्दल डीटेल माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या वेबसाईट वरती पाहू शकता.
Power Factor Formula:
Difference Between kW, kVAR And kVA
| Feature | kW (Kilowatt) | kVAR (Kilovolt-Ampere Reactive) | kVA (Kilovolt-Ampere) |
|---|---|---|---|
| Meaning | Active Power (Real Power) | Reactive Power | Apparent Power (Total Power) |
| Function | Does actual useful work | Supports magnetic field (no real work) | Total supplied power in system |
| Role in System | Runs equipment (motors, heaters, lights) | Maintains voltage and magnetic field | Combination of kW and kVAR |
| Energy Consumption | Consumed as useful energy | Not consumed as useful work | Represents total demand |
| Unit Type | Real power unit | Reactive power unit | Total power unit |
| Formula | kW = kVA × cosφ | kVAR = kVA × sinφ | kVA = √(kW² + kVAR²) |
| Measured By | Wattmeter / Energy meter | VAR meter | Voltmeter + Ammeter calculation |
| Used For | Actual load calculation, billing | Power factor correction | Transformer & generator rating |
| Practical Example | Heater producing heat | Motor coil creating magnetic field | Total power supplied to motor |
| Relation | Useful power | Supporting power | Resultant total power |
FAQ’s
Electrical Power आणि Electrical Energy यात फरक काय?
Electrical Power म्हणजे energy किती वेगाने वापरली किंवा transfer केली जाते याचा rate. याची unit Watt (W) किंवा kilowatt (kW) असते. तर Electrical Energy म्हणजे ठराविक वेळेत वापरलेली एकूण power. म्हणजे device किती वेळ चाललं आणि त्या वेळेत किती electricity वापरली याचं मोजमाप म्हणजे Energy. याची unit kilowatt-hour (kWh) असते.
Reactive Power नसल्यावर motor चालू शकते का ?
नाही. Reactive Power नसल्यावर induction motor चालू शकत नाही. कारण motor चालण्यासाठी तिच्या coil मध्ये magnetic field तयार होणं आवश्यक असतं, आणि हा magnetic field तयार करण्यासाठी Reactive Power लागते. जर Reactive Power उपलब्ध नसेल तर magnetic field तयार होत नाही आणि rotor फिरण्यासाठी force मिळत नाही, त्यामुळे motor start होत नाही.
Electrical Power frequency बदलली तर power consumption बदलतो का?
हो, Electrical Power ची frequency बदलली तर power consumption बदलू शकतो. कारण frequency बदलल्यावर motor speed, impedance आणि overall system efficiency बदलते.
Conclusion
या लेखामधून आपण Type of Electrical Power in Marathi या विषयाची संपूर्ण माहिती समजून घेतली. Electrical system मध्ये power फक्त एकच प्रकारची नसते, तर Active Power (kW), Reactive Power (kVAR) आणि Apparent Power (kVA) हे तीन महत्त्वाचे प्रकार एकत्र काम करतात हे आपल्याला कळलं. कोणती power प्रत्यक्ष काम करते, कोणती system चालण्यासाठी मदत करते आणि total supply कशी मोजली जाते हेही स्पष्टपणे समजलं.
सोप्या भाषेत सांगायचं तर, Electrical Power Information in Marathi आणी Type of Electrical Power समजून घेतल्यावर electrical devices आणि industrial system कशी सुरळीत चालते हे स्पष्ट होईल. Power चे प्रकार आणि त्यांचा योग्य balance समजला तर energy saving, cost control आणि system performance सुधारण्यासाठी मोठी मदत होते हाच या लेखाचा मुख्य takeaway आहे.











