Capacitor Kay Kaam Karto? Complete Guide in Marathi 2026

Last Updated: 24 March 2026

आपण आज रोजच्या वापरत असलेल्या जवळपास प्रत्येक electrical किंवा electronic वस्तूमध्ये जसे की Fan, T.V, Mobile Charger, fridge, Inverter या सगळ्यांमध्ये Capacitor वापरला जातो. पण बर्‍याच लोकांना याबद्दल स्पष्टपणे माहिती नसते की Capacitor Kay Kaam Karto आणि तो इतका गरजेचा का आहे. हा ब्लॉग आपण सोप्या, रोजच्या वापरातल्या भाषेत लिहिलेला आहे, जेणेकरून कोणालाही capacitor information in Marathi, capacitor use, आणि capacitor working सहज समजू शकेल.

Tip: हा लेख 24 मार्च 2026 मध्ये अपडेट करण्यात आला असून, यामध्ये नवीन technology आणि real-life उदाहरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.

Capacitor म्हणजे काय?

Capacitor हा असा एक electrical component आहे जो वीज थोड्या वेळासाठी साठवून ठेवतो आणि गरज पडल्यावर ती वीज परत वापरायला देतो. Capacitor दोन धातूच्या पट्ट्यांपासून (Conductive Plates) पासून बनलेला असतो. त्या दोन पट्ट्यांच्या मध्ये डायलेक्ट्रिक (Dielectric) पदार्थ असतो जो वीज थेट जाऊ देत नाही. जेव्हा वीज दिली जाते तेव्हा capacitor मध्ये वीज साठते आणि गरज पडल्यावर ती वीज बाहेर सोडली जाते. कॅपेसिटरचा सर्वात जास्त वापर motors मध्ये होतो, starting साठी. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी Motor कशी काम करते हा लेख वाचा.

Capacitor Kay Kaam Karto?

Capacitor चं मुख्य काम म्हणजे वीज थोड्या वेळासाठी साठवणं आणि योग्य वेळी ती वीज परत देन. जेव्हा electrical supply सुरू असतो तेव्हा capacitor मध्ये वीज जमा होते आणि supply कमी झाली किंवा अचानक भासली, तेव्हा capacitor ही साठवलेली वीज circuit ला देतो. त्यामुळे उपकरणं अचानक बंद पडत नाहीत आणि त्यांचं काम सुरळीत चालू राहतं.

घरातील पंखा, single phase motor किंवा pump सुरू करताना सुरुवातीला Reactive Power ची गरज आसते. त्या वेळी capacitor आपल्या मदतीला येतो. तो motor ला सुरुवातीची जास्त ताकद देतो, ज्यामुळे motor सहज सुरू होतो. जर आपण Motor चालू करताना capacitor चा वापर नाही केला तर motor फक्त आवाज करते पण फिरत नाही.

Industry Level ला सांगायचे झाले तर Heavy Machines जसे की मोटर आणी transformer Reactive Power जास्त घेतात. अशा ठिकाणी Load कमी होण्यासाठी आणी PF सुधारण्यासाठी Capacitor हा वापरला जातो.

थोडक्यात सांगायचं तर capacitor उपकरणांना सुरू होण्यासाठी मदत करतो, त्यांचं काम smooth ठेवतो आणि electrical system smooth ठेवतो. म्हणूनच capacitor हा छोटा असला तरी प्रत्येक electrical आणि electronic system साठी हा खूप महत्त्वाचा Component आहे. Capacitor बद्दल अधिक technical माहिती All About capacitor येथे वाचू शकता.

Capacitor चे प्रकार कोण कोणते आहेत?

वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे Capacitor हे वापरले जातात. सगळे Capacitor हे सारखं काम करत नाहीत. काही Capacitor हे वीज साठवण्यासाठी वापरले जातात, तर काही voltage control किंवा electronic circuit smooth चालण्यासाठी वापरले जातात. खाली काही प्रकार एक एक करून समजून घेऊ. आजकाल industrial applications मध्ये VFD सोबत capacitor चा वापर खूप महत्त्वाचा आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी VFD कसा काम करतो हा article वाचा.

Electrolytic Capacitor

Electrolytic capacitor हा मार्केटमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा capacitor आहे. ह्या capacitor चे वैशिष्ट्ये म्हणजे हा capacitor जास्त प्रमाणात वीज साठवू शकतो, म्हणूनच तो fan, inverter, power supply आणि motor मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. Electrolytic Capacitor हा दिसायला मोठा असतो त्यावरती + आणी – अशी दोन चिन्हे असतात ही या capacitor ची ओळख पटवतात.

Ceramic Capacitor

Ceramic capacitor हा आकाराने खूप छोटा असतो आणि प्रामुख्याने electronic boards मध्ये वापरला जातो. मोबाईल, टीव्ही, रेडिओ, चार्जर अशा Device मध्ये पहायला भेटतो. हा Capacitor जास्त प्रमाणत वीज साठवत नाही, पण voltage stable ठेवण्यासाठी आणि noise कमी करण्यासाठी हा वापरला जातो.

Film Capacitor

Film capacitor हा सुरक्षित आणि industrial circuits मध्ये स्थिर काम करण्यासाठी वापरला जातो. हा capacitor industrial circuits, control panels आणि AC applications मध्ये प्रामुख्याने वापरला जातो. Film capacitor ची खास गोष्ट म्हणजे तो लवकर खराब होत नाही आणि जास्त काळ टिकतो. ज्या ठिकाणी voltage स्थिर ठेवणं हे महत्त्वाचं असतं, तिथे हा capacitor वापरला जातो.

Tantalum Capacitor

Tantalum capacitor हा electrolytic capacitor सारखाच असतो, पण आकाराने दिसायला लहान आणि performance च्या बाबतीत चांगला असतो. हा capacitor मोबाईल, laptop आणि modern electronic devices मध्ये वापरला जातो. हा Capacitor महाग असतो आणि जास्त voltage सहन करू शकत नाही.

Super Capacitor

Super capacitor हा नवीन आणि advanced प्रकारचा capacitor आहे. हा capacitor खूप जास्त वीज साठवू शकतो आणि पटकन charge तसेच discharge होतो. 2026 मध्ये electric vehicle, solar system आणि energy storage system मध्ये super capacitor चा वापर वाढत आहे. भविष्यात battery ला पर्याय म्हणून super capacitor वापरला जाऊ शकतो.

Multimeter ने कॅपेसिटर कसा तपासावा?

कॅपेसिटर तपासण्याआधी safety खूप महत्त्वाची आहे. कॅपेसिटरमध्ये आधीपासून electric charge साठलेला असू शकतो, त्यामुळे थेट हात लावल्यास shock बसू शकतो. त्यामुळे सर्वात आधी power supply बंद करा आणि capacitor पूर्णपणे discharge करा. Discharge करण्यासाठी resistor वापरणे ही safe पद्धत आहे. ही छोटी काळजी घेतली तर तुम्ही सुरक्षितपणे testing करू शकता.

Capacitance Mode ने कॅपेसिटर तपासणे

जर तुमच्या multimeter मध्ये capacitance (µF) मोजण्याची सुविधा असेल, तर ही सर्वात accurate पद्धत आहे. Multimeter capacitance mode मध्ये सेट करून capacitor चे terminals connect करा. Display वर जी value दिसेल ती capacitor वर दिलेल्या value जवळ असेल तर capacitor चांगला आहे. पण जर reading खूप कमी किंवा zero दिसत असेल, तर capacitor खराब झालेला असण्याची शक्यता जास्त असते.

Resistance Mode (Ω) ने कॅपेसिटर तपासणे

Basic multimeter मध्ये capacitance mode नसल्यास resistance mode वापरता येतो. Multimeter Ω mode मध्ये ठेवून probes capacitor ला लावले की सुरुवातीला reading कमी येते आणि नंतर हळूहळू वाढते, याचा अर्थ capacitor charge होत आहे आणि तो ठीक आहे. जर reading सतत 0 राहिली तर capacitor short झाला आहे, आणि जर काहीच बदल दिसला नाही तर तो open (faulty) असतो.

Continuity Mode ने कॅपेसिटर तपासणे

Continuity mode हा एक simple आणि quick check करण्याचा मार्ग आहे. Multimeter continuity mode मध्ये ठेवून capacitor ला connect केल्यावर जर सतत beep आवाज येत असेल तर capacitor short झालेला आहे. जर आवाज येत नसेल, तर capacitor ठीक असण्याची शक्यता असते, पण ही पद्धत पूर्णपणे accurate नसते.

Capacitor आणि Battery मध्ये काय फरक आहे?

Battery Light जास्त वेळासाठी साठवून ठेवते, तर capacitor हा लाइट कमी वेळासाठी साठवून ठेवतो. Battery चा उपयोग हा मोबाइल किंवा inverter साठी होतो, तर capacitor fan, motor आणि electronic circuits मध्ये वापरला जातो.

चुकीचा capacitor वापरल्यावर काय होईल?

चुकीची value किंवा चुकीच्या प्रकारचा capacitor जर आपण Device मध्ये वापरला तर आपले device खराब होऊ शकते. कधी कधी capacitor फुटण्याची किंवा जळण्याचीही शक्यता असते, त्यामुळे नेहमी योग्य capacitor वापरा.

Capacitor गरम झाला तर काय समजायचं?

Capacitor जास्त गरम होत असेल तर त्यावर जास्त voltage येत आहे किंवा capacitor जुना झाला आहे, असं समजायचं. अशा वेळी तो लवकर खराब होऊ शकतो, त्यामुळे capacitor बदलणं सुरक्षित ठरतं.

Conclusion

आज आपण या ब्लॉग पोस्ट मधून माहिती घेतली की Capacitor वीज साठवतो, voltage stable ठेवतो, reactive power control करतो आणि संपूर्ण system ला smooth चालवण्यास मदत करतो. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे capacitor वापरले जातात, जसं की electrolytic, ceramic, film, tantalum आणि super capacitor.

आजच्या modern technology मध्ये capacitor शिवाय कोणतंही electrical किंवा electronic system पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच capacitor विषयी basic माहिती असणं हे electrician, student, technician यांना आवश्यक आहे.

आशा आहे की हा ब्लॉग वाचल्यानंतर “Capacitor म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि तो का गरजेचा आहे” हे तुम्हाला सोप्या भाषेत समजलं असेल. पुढच्या लेखांमध्ये आपण अशाच electrical विषयांवर सविस्तर माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला या ब्लॉग विषयी काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर Contact आम्हाला संपर्क साधा तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे नक्की देऊ.

Leave a Comment