Electrical कामात 3 फेज मोटर सुरू करण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे Three Phase DOL Starter. DOL म्हणजे Direct Online Starter. या पद्धतीत मोटरला थेट लाईनमधून पूर्ण व्होल्टेज दिले जाते, त्यामुळे मोटर पटकन सुरू होते.
या ब्लॉगमध्ये आपण Three Phase DOL Starter in Marathi, DOL Starter म्हणजे काय, तो कसा काम करतो (working principle), त्यात कोणते Partअसतात जसे Contactor, Overload Relay आणि Start-Stop Push Button याबद्दल माहिती पाहणार आहे. तसेच DOL Starter Power Diagram, control wiring कशी असते, मोटर कशी जोडतात आणि कुठे वापरतात याचीही माहिती मिळेल. हा लेख वाचल्यानंतर Three Phase DOL Starter बद्दल तुम्हाला स्पष्ट माहिती मिळेल.
Table of Contents
What is DOL Starter
DOL Starter म्हणजे Direct Online Starter. हा 3 Phase motor सुरू करण्यासाठी वापरला जाणारा सर्वात सोपा starter आहे. यामध्ये motor ला supply line मधून थेट full voltage दिले जाते, त्यामुळे motor start होताच लगेच full speed ने चालू होते.
DOL Starter मध्ये Contactor, Overload Relay आणि Start-Stop Push Button असतात. Start बटन दाबल्यावर contactor ON होतो आणि motor ला power मिळते. Stop बटन दाबल्यावर supply बंद होते. Motor वर जास्त load किंवा current वाढला तर Overload Relay automatic trip होऊन motor चे protection करतो.
हा starter Small capacity च्या motors साठी वापरला जातो. 1 HP ते 5 HP पर्यंतच्या 3 Phase motors साठी DOL Starter जास्त वापरतात. काही ठिकाणी supply condition चांगली असेल तर 7.5 HP किंवा 10 HP motor साठीही वापरला जातो.
Water pump, air compressor, small machine, workshop motor आणि agricultural motor मध्ये DOL Starter सर्वात जास्त वापरला जातो कारण त्याची wiring सोपी असते आणि operation easy असते.
DOL Starter Power Diagram

DOL Starter Connection Diagram

Three Phase DOL Starter in Marathi
Three Phase DOL Starter हा 3 phase induction motor सुरू करण्यासाठी वापरला जाणारा एक Starter आहे. या पद्धतीमध्ये motor ला कोणताही voltage कमी-जास्त न करता supply मधून सरळ जोडले जाते. त्यामुळे motor start होताना high starting current घेते आणि काही सेकंदात normal speed ने चालते.
हा starter अशा ठिकाणी वापरला जातो जिथे motor ची capacity कमी असते आणि supply line strong असते. साधारणपणे up to 5 HP motor साठी हा योग्य मानला जातो. जर motor ची HP जास्त असेल तर starting current मुळे voltage drop होऊ शकतो, त्यामुळे मोठ्या motor साठी दुसरी starting method वापरली जाते.
Single Phase DOL Starter
Single Phase DOL Starter म्हणजे single phase motor सुरू करण्यासाठी वापरला जाणारा एक simple starter आहे. म्हणजे motor ला supply मधून थेट जोडले जाते. Start बटन दाबल्यावर motor ला पूर्ण voltage मिळते आणि ती लगेच सुरू होते.
हा starter प्रामुख्याने 1 HP, 1.5 HP, 2 HP अशा small capacity च्या single phase motors साठी वापरला जातो. घरातील water pump, borewell pump, small air compressor, flour mill किंवा workshop मधील machine साठी Single Phase DOL Starter जास्त वापरला जातो. Single Phase DOL Starter वर डीटेल माहिती तुम्ही Single Phase Motor DOL Starter Detail Information या ब्लॉगमध्ये वाचू शकता.
Single Phase DOL Starter Connection Diagram

DOL Starter Working Principle in Marathi
जेव्हा आपण Start button दाबतो तेव्हा control circuit मधून current जाऊन Contactor coil energize होते. Coil energize होताच contactor चे main contacts बंद होतात आणि supply थेट motor ला जातो. त्यामुळे motor सुरू होते.
Motor सुरू झाल्यानंतर contactor मध्ये एक auxiliary contact असतो जो holding साठी वापरला जातो. त्यामुळे Start button सोडल्यावरही contactor ON राहतो आणि motor चालूच राहते. याला holding circuit किंवा self-holding system म्हणतात.
जर आपण Stop button दाबले तर control circuit तुटते, contactor coil बंद होते आणि main contacts open होतात. त्यामुळे motor ला जाणारी supply थांबतो आणि motor बंद होते.
Motor वर जास्त load आला किंवा current वाढला तर Overload Relay (OLR) trip होतो. OLR trip झाल्यावर control circuit cut होतो आणि contactor बंद पडतो. त्यामुळे motor जळण्यापासून वाचते. Overload Relay बद्दल तुम्ही Function of Overload Relay in Marathi या ब्लॉगमध्ये सविस्तर माहिती घेऊ शकता.
FAQ’s
DOL Starter ला Neutral लागतो का?
साधारण 3 Phase DOL Starter मध्ये neutral लागत नाही कारण motor 3 phase वर चालते. पण control circuit 230V वर असेल तर neutral लागू शकते.
DOL Starter किती starting current घेतो?
Motor start होताना normal current च्या साधारण 6 ते 8 पट current घेतो. म्हणून मोठ्या HP motor साठी DOL वापरत नाही.
DOL Starter मध्ये phase change केल्यावर काय होते?
DOL Starter मध्ये जर आपण कोणत्याही दोन phase R आणि Y ची जागा बदलली, तर motor ची rotation direction उलटी होते. म्हणजे motor clockwise फिरत असेल तर ती anticlockwise फिरायला लागते.
Conclusion
या लेखात आपण Three Phase DOL Starter in Marathi या विषयावर सविस्तर माहिती समजून घेतली. पासून सुरुवात करून त्याची रचना, काम करण्याची पद्धत आणि DOL Starter Power Diagram हेही पाहिले. DOL Starter हा 3 phase motor थेट line ला जोडून सुरू करणारा साधा आणि सरळ starter आहे हे आपल्याला स्पष्ट झाले.
तसेच हा starter कोणत्या HP motor साठी वापरतात, तो कसा start-stop करतो आणि motor चे protection कसे करतो हे पण आपण शिकलो. आता Three Phase DOL Starter बद्दल basic ते practical संपुर्ण माहिती तुम्हाला मिळालेली आहे, जी wiring करताना किंवा exam साठी नक्की उपयोगी पडेल.











