Electrical Earthing का गरजेची आहे | Electrical Earthing All Information In Marathi

Electrical Earthing का गरजेची आहे: आजच्या काळात आपण घरात किंवा कामाच्या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक कामासाठी electrical Device वरती अवलंबून आहोत. जसं की पंखा, फ्रिज, वॉशिंग मशीन, मिक्सर, मोटर इत्यादी. ही सर्व Electrical Devices सुरक्षितपणे चालण्यासाठी Electrical Earthing खूप महत्वाची असते. Earthing मुळे electrical device मध्ये अतिरिक्त किंवा चुकून निर्माण झालेला करंट थेट जमिनीत जातो, त्यामुळे माणसाला Shock बसण्याचा धोका टळतो.

जर योग्य प्रकारे Earthing केलेली नसेल तर करंट लीक होणे, स्विच किंवा बोर्ड गरम होणे, Device वारंवार खराब होणे असे अनेक प्रॉब्लेम येतात. अनेक वेळा छोटे अपघात मोठ्या दुर्घटनेत बदलू शकतात. म्हणूनच घरगुती वायरिंग असो किंवा कंपनीमधील Device, Electrical Earthing ही सुरक्षतेच काम करते. या लेखात आपण Electrical Earthing म्हणजे काय तिचे प्रकार आणि योग्य Earthing कशी करावी याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत पाहणार आहोत त्याचसोबत Electrical Earthing In Marathi यावरती आवश्यक माहिती घेणार आहे.

Electrical Earthing म्हणजे काय?

Electrical Earthing म्हणजे Electrical System मधून चुकून तयार होणारा किंवा Leakage झालेला Electric Current सुरक्षितपणे जमिनीत सोडण्याची पद्धत. Electrical Earthing चा मुख्य उद्देश माणसाला Electric Shock पासून वाचवणं आणि Electrical Device सुरक्षितपणे चालवने.

जेव्हा एखाद्या Device ची वायर खराब होते, Insulation तुटते किंवा ओलावा येतो, तेव्हा ती Wire खराब होऊन Metal बॉडीशी Live होऊ शकते. अशा वेळेस Earthing नसल्यावर तो Current Direct माणसाच्या शरीरातून वाहू शकतो. म्हणूनच Electrical System मध्ये Earthing असणं महत्वाचं आहे.

Electrical Earthing का गरजेची आहे?

Electrical Earthing का गरजेची आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला रोजच्या जीवनातल्या छोट्या घटनांकडे पाहावं लागेल. अनेक वेळा आपण ओल्या हाताने Fridge उघडतो, Washing Machine जवळ उभे राहतो किंवा Water Heater वापरतो. अशा वेळी डिवाईसमध्ये Leakage असेल आणि Earthing नीट नसेल, तर Electric Shock बसण्याची शक्यता खूप असते.

योग्य Earthing असल्यामुळे हा Leakage Current माणसाच्या शरीरातून न जाता थेट जमिनीत जातो. त्यामुळे जीवितहानी टळते आणि मोठा अपघात होण्यापासून वाचतो. याच कारणामुळे घरगुती तसेच Industrial Electrical System मध्ये Earthing ला खूप महत्व दिलं जातं.

Electrical Earthing And Device Safety

आजच्या काळात वापरली जाणारी Electrical आणि Electronic उपकरणे खूप महाग आहेत. Voltage मध्ये काही खालीवर झालं, अचानक Current वाढला किंवा Electrical Fault झाला, तर मोटार जळणं, PCB खराब होणं किंवा मशीन पूर्णपणे बंद पडणं अशा समस्या निर्माण होतात.

Electrical Earthing मुळे अतिरिक्त Current Control होतो आणि तो सुरक्षित मार्गाने जमिनीत सोडला जातो. त्यामुळे Device वरती ताण येत नाही आणि Device खुप जास्त काळ सुरक्षितपणे वापरता येते.

Earthing Resistance म्हणजे काय?

Earthing Resistance म्हणजे Earthing मधून वीज जमिनीत जाण्याला किती अडथळा येतो ते मोजण्याचं प्रमाण.

जेव्हा Electrical Fault होतो तेव्हा अतिरिक्त Electric Current Earthing Wire मधून Earth (जमिनीत) जायला हवा. जर हा Current सहजपणे आणि पटकन जमिनीत गेला, तर Earthing चांगली मानली जाते. पण जर जमिनीत जाण्यास अडथळा आला, म्हणजेच Resistance जास्त असेल, तर Earthing नीट काम करत नाही.

म्हणजेच,
Earthing Resistance कमी असेल → Current पटकन जमिनीत जातो → Safety जास्त
Earthing Resistance जास्त असेल → Current अडकतो → Shock आणि आग याचा धोका वाढतो

सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर, पाणी वाहण्यासाठी मोठी पाइप असेल तर पाणी सहज जातं. पण पाइप खूप बारीक असेल तर पाणी अडतं. त्याचप्रमाणे Earthing Resistance कमी असेल तर वीजेला जमिनीत जायला सोपा मार्ग मिळतो.

घरगुती Earthing साठी साधारणपणे 1 ते 5 Ohm Resistance योग्य मानली जाते. Industrial ठिकाणी ही किंमत अजून कमी असावी लागते. म्हणूनच Earthing करताना आणि दरवर्षी तपासताना Earthing Resistance Check करणं खूप महत्वाचं असतं.

Also Read Similar Article Electric Current Flow कसा होतो

Electrical Earthing चा वापर न केल्यास होणारे धोके

जर Electrical Earthing योग्य पद्धतीने केलेली नसेल किंवा अजिबात केलेलीच नसेल, तर त्याचे परिणाम वाईट असू शकतात. Electric Shock हा सर्वात मोठा धोका असतो, जो काही वेळा जीवघेणाही ठरू शकतो. याशिवाय Short Circuit मुळे वायर गरम होते आणि आग लागण्याची शक्यता वाढते.

बर्‍याच वेळा RCCB किंवा ELCB सारखी सुरक्षा उपकरणे Earthing नसल्यामुळे नीट काम करत नाहीत. त्यामुळे Fault झाला तरी Supply वेळेवर बंद होत नाही आणि धोका वाढतो. ह्यामुळेच Electrical Earthing का गरजेची आहे हे समजून घेणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे.

Electrical Earthing कसे काम करते?

Electrical Earthing ही एक पूर्ण System असते. प्रत्येक Electrical उपकरणाचा Metal Body Earthing Wire शी जोडलेला असतो. ही Earthing Wire पुढे Earth Pit शी जोडलेली असते, जी जमिनीत खोलवर बसवलेली असते.

जेव्हा Electrical Circuit मध्ये Fault होतो, तेव्हा Current Earthing Wire मधून वाहत Earth Pit कडे जातो आणि शेवटी जमिनीत जाऊन मिळतो. याच वेळी MCB किंवा RCCB Trip होऊन Electrical Supply बंद होते आणि अपघात टळतो. ही प्रक्रिया काही सेकंदात घडते.

Type Of Electrical Earthing

Type Of Electrical Earthing

योग्य Earthing नसेल तर करंट लीक होणे, उपकरण खराब होणे किंवा Shock लागने ह्या समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार Earthing करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. खाली आपण Electrical Earthing चे प्रमुख प्रकार, याची सोप्या भाषेत माहिती पाहणार आहोत.

1. Plate Earthing

Plate Earthing मध्ये तांब्याची (Copper) किंवा लोखंडाची (GI) प्लेट जमिनीत खोलवर पुरली जाते. प्लेटभोवती मीठ आणि कोळसा टाकला जातो जेणेकरून जमिनीतून करंट सहज खाली जाऊ शकेल. ही पद्धत घरांमध्ये आणि लहान इमारतींमध्ये वापरली जाते.

2. Pipe Earthing

Pipe Earthing मध्ये छिद्र असलेली GI पाइप जमिनीत उभी पुरली जाते. ही पद्धत भारतात जास्त प्रमाणात वापरली जाते कारण ती स्वस्त, टिकाऊ आणि प्रभावी असते. पाणी टाकण्यासाठी पाइपमध्ये जागा असल्यामुळे Earthing चांगली राहते.

3. Rod Earthing

Rod Earthing मध्ये तांब्याची किंवा GI रॉड थेट जमिनीत ठोकली जाते. ही पद्धत कमी जागेत करता येते आणि जिथे जमीन कठीण आहे तिथे उपयोगी ठरते. लाइटनिंग प्रोटेक्शनसाठी पण याचा वापर होतो.

4. Strip / Wire Earthing

या प्रकारात तांब्याची किंवा GI पट्टी (Strip) किंवा वायर जमिनीत आडवी पुरली जाते. मोठ्या औद्योगिक प्लांट, सबस्टेशन किंवा मोठ्या इमारतींसाठी ही पद्धत वापरली जाते. Electrical Earthing बद्दल अजून माहिती हवी असेल तर What is Earthing येथे पहा.

घरगुती Earthing का महत्वाची आहे?

आज जवळजवळ प्रत्येक घरात Metal Body असलेली Device वापरली जातात. लहान मुलं, वयस्कर लोक आणि सामान्य व्यक्ती यांचा या डिवाईसशी रोजचा संपर्क येतो. अशा वेळेस Earthing नसेल तर छोटा Fault सुद्धा मोठा अपघात घडवू शकतो. म्हणून घरातील Electrical Wiring करताना Earthing कडे दुर्लक्ष करू नये.

Electrical Earthing कशी चेक करायची?

सर्वसाधारणपणे Electrician Earth Tester (Earth Megger) नावाचं उपकरण वापरतो. या मशीनमधून Earthing Resistance Ohm मध्ये मोजली जाते. टेस्ट करताना Earth Pit पासून थोड्या अंतरावर दोन लोखंडी रॉड जमिनीत मारल्या जातात आणि Tester जोडून Reading घेतली जाते.

Earthing खराब आहे कस ओळखायचं?

जर Earthing नीट नसेल तर काही गोष्टी जाणवतात. Fridge किंवा Washing Machine ला हात लावताना हलका Shock जाणवतो. MCB किंवा RCCB वारंवार Trip होत नाही किंवा Fault असूनही Supply चालू राहते. कधी कधी Wire गरम झाल्याचं किंवा Socket स्पार्क होत असल्याचं जाणवतं.

Earthing Wire कोणत्या रंगाची असते?

Electrical नियमांनुसार Earthing Wire सहसा Green किंवा Green-Yellow रंगाची असते. यामुळे Electrician आणि User दोघांनाही लगेच कळतं की ही Wire Safety साठी आहे. चुकीच्या रंगाची Wire वापरल्यास Maintenance वेळी गोंधळ होऊ शकतो.

Conclusion

या ब्लॉगमध्ये आपण Electrical Earthing का गरजेची आहे हे सविस्तरपणे समजून घेतले. Earthing मुळे Electrical डिवाईसमधून येणारा अतिरिक्त करंट सुरक्षितपणे जमिनीत जातो, त्यामुळे माणसाचा जीव सुरक्षित राहतो आणि डिवाईसचे नुकसान टळते. योग्य Earthing नसेल तर लहान-लहान electrical fault सुद्धा मोठ्या अपघाताचे कारण बनू शकतात, हे आपण पाहिले.

तसेच या लेखात आपण Electrical Earthing चे महत्त्व, तिचे फायदे आणि योग्य Earthing केल्यामुळे घरगुती तसेच industries wiring कशी सुरक्षित राहते हे शिकलो. त्यामुळे नवीन wiring करताना किंवा जुनी wiring तपासताना Earthing कडे कधीही दुर्लक्ष करू नये. Electrical System साठी योग्य Earthing ही गरज नाही तर आवश्यक गोष्ट आहे.

Leave a Comment