Electric Current Flow कसा होतो | Electric Current Information In Marathi 2026

Last Updated: 30 March 2026

आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत वीज वापरत असतो. पण Electric Current Flow कसा होतो किंवा Electric Current म्हणजे काय याची माहिती खूप कमी लोकांना असते. लाईट लावणं, पंखा चालू करणं, मोबाईल चार्ज करणं, टीव्ही पाहणं या सगळ्या गोष्टी Electric Current मुळेच शक्य होतात. आपण रोज वापरत असलेला हा Electric Current नेमका काय असतो, तो वायरमधून कसा वाहतो आणि तो नसला तर काय होईल, याचा विचार फार कमी लोक करतात.

या लेखात आपण Electric Current Flow कसा होतो हे सुरुवातीपासून रोजच्या वापरतल्या मराठीत समजून घेणार आहे. AC आणि DC Current मध्ये काय फरक आहे, Current मोजण्याचं एकक काय आहे, Ohm’s Law काय सांगतो आणि Electric Current मुळे Shock का लागतो, ही सर्व माहिती आपण या लेखात पुढे दिलेली आहे.

Tip: हा लेख 30 मार्च 2026 मध्ये अपडेट करण्यात आला असून, यामध्ये नवीन technology आणि real-life उदाहरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.

Electric Current म्हणजे काय?

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर Electric Current म्हणजे Electric Charge चा Flow होय. जेव्हा इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करतात, तेव्हा त्या हालचालीमुळे Electric Current तयार होतो.

आपण एक उदाहरण घेऊन समजू तर टाकीत पाणी साठलेलं असतं, पण नळ उघडल्यावरच पाणी वाहायला लागतं. त्याचप्रमाणे वायरमध्ये इलेक्ट्रॉन असतात, पण जोपर्यंत सर्किट पूर्ण होत नाही आणि Voltage मिळत नाही, तोपर्यंत Current वाहत नाही.

Electric Current चा शोध कोणी लावला?

Electric Current हा एकाच दिवसात किंवा एका व्यक्तीने शोधलेला विषय नाही. अनेक scientist ने वर्षानुवर्षे संशोधन करून Electric Current चा शोध लावला. त्यात काही नावे आपल्या समोर येतात ते पुढे आपण या लेखात पाहू.

Benjamin Franklin यांनी पहिल्यांदा Positive आणि Negative Charge यांची संकल्पना मांडली. त्यानंतर André-Marie Ampère यांनी Electric Current आणि त्याचे होणारे परिणाम यावर सखोल अभ्यास केला. Electric Current मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक Ampere (A) हे त्यांच्याच नावावरून देण्यात आलं.

Electric Current Flow कसा होतो?

Electric Current Flow कसा होतो

Electric Current Flow होण्यासाठी तीन गोष्टी गरजेच्या असतात.

  1. Voltage – जो इलेक्ट्रॉनना हालचाल करण्यासाठी शक्ती फोर्स देतो
  2. Closed Circuit – सर्किट कुठेही तुटलेलं नसेल तरच Current वाहतो
  3. Conductor – जसं की Copper किंवा Aluminium वायर

जेव्हा सर्किटला Voltage दिलं जातं, तेव्हा वायरमधील इलेक्ट्रॉन एका दिशेने दुसरीकडे हालचाल करायला लागतात आणि Electric Current Flow सुरू होतो.

Conventional Current Flow आणि Electron Flow

शालेय पुस्तकांमध्ये Current हा Positive कडून Negative कडे वाहतो असं दाखवलं जातं, याला Conventional Current Flow म्हणतात. प्रत्यक्षात मात्र Electron Negative कडून Positive कडे वाहतात. शिकताना दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. Conventional Current Flow या विषयावर डीटेल माहिती All About Conventional Current Flow या ब्लॉगमध्ये पाहू शकता.

Electric Current चे प्रकार

Direct Current (DC)

Direct Current म्हणजे असा Current जो सतत एकाच दिशेने वाहतो. Battery मधून मिळणारा Current हा DC असतो. Mobile, Laptop, Torch, Solar System यामध्ये DC Current चा वापर केला जातो.

Alternating Current (AC)

Alternating Current मध्ये Current ची दिशा सतत बदलत असते. आपल्या घरात येणारी वीज ही AC असते. AC Current वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे तो कमी नुकसानात लांब अंतरापर्यंत पोहोचवता येतो. AC आणी DC Current बद्दल आधिक डीटेल माहिती Type of Electrical Power in Marathi या ब्लॉगमध्ये वाचू शकता.

Effect of Electric Current In Marathi

जेव्हा Electric Current एखाद्या चालकातून वाहतो, तेव्हा त्याचे काही ठराविक परिणाम दिसून येतात. या परिणामांना Electric Current चे परिणाम (Effects of Electric Current) असे म्हणतात.

1. Heating Effect of Electric Current (उष्णता परिणाम)

Electric Current वाहिल्यावर चालक गरम होतो.
हा परिणाम Electric Heater, Iron, Geyser, Bulb मध्ये वापरला जातो.

2. Magnetic Effect of Electric Current (चुंबकीय परिणाम)

जेव्हा Electric Current वाहतो, तेव्हा त्या चालकाच्या आजूबाजूला Magnetic Field तयार होतो.
हा परिणाम Motor, Fan, Electric Bell मध्ये वापरला जातो.

3. Chemical Effect of Electric Current (रासायनिक परिणाम)

Electric Current एखाद्या द्रवातून (Electrolyte) वाहिल्यास Chemical Reaction होते.
हा परिणाम Electroplating, Battery, Water Purification मध्ये वापरतात.

4. Luminous Effect of Electric Current (प्रकाश परिणाम)

Electric Current मुळे प्रकाश निर्माण होतो.
हा परिणाम Bulb, Tube Light, LED मध्ये दिसतो.

Electric Current चे सूत्र (Formula)

Electric Current काढण्यासाठी खाली दिलेले सूत्र वापरतात:

I = Q / t

  • I = Electric Current (Ampere)
  • Q = Electric Charge (Coulomb)
  • t = वेळ (Second)

उदाहरणार्थ, जर 10 सेकंदात 20 Coulomb Charge वाहत असेल, तर Current = 2 Ampere होतो. अशा पद्धतीने Current काढता येतो.

Electric Current चे एकक (Unit)

Electric Current मोजण्यासाठी जे एकक वापरतात त्याला Ampere (A) असं म्हणतात.
सोप्या शब्दात सांगायचं तर,

1 Ampere म्हणजे 1 सेकंदात 1 Coulomb इतका Charge वाहणं.

  • मोबाईल चार्जरला साधारण 1 ते 3 Ampere Current लागतो
  • LED Bulb ला फार कमी Current लागतो
  • Heater किंवा Iron ला जास्त Ampere लागतो

कमी Current दाखवण्यासाठी:

Microampere (μA) – अतिशय कमी Current

Milliampere (mA) – खूप कमी Current

Electric Current कसे मोजतात?

Electric Current मोजण्यासाठी Ammeter किंवा Multimeter वापरतात.

  • Ammeter नेहमी Series मध्ये जोडतात
  • कारण पूर्ण Current त्याच उपकरणातून जातो
  • Parallel मध्ये जोडल्यास Meter खराब होऊ शकतो

घरगुती किंवा field कामात Multimeter जास्त वापरतात.
Multimeter ने Current, Voltage आणि Resistance सगळं मोजता येतं, पण Current मोजताना योग्य Range निवडणं ते महत्वाचं असतं. Electric Current बद्दल अधिक technical माहिती All About Electrical Current येथे वाचू शकता.

Electric Current आणि Ohm’s Law

Ohm’s Law हा Electric Current समजण्यासाठी खूप महत्वाचा नियम आहे.

Ohm’s Law Formula:
V = I × R

याचा अर्थ असा होतो की:

  • Voltage (V) वाढवलं → Current (I) वाढतो
  • Resistance (R) वाढवलं → Current कमी होतो

उदाहरण:
जर वायर खूप पातळ असेल तर Resistance जास्त असतो, त्यामुळे Current कमी वाहतो.
म्हणूनच जास्त Load साठी जाड वायर वापरतात.

Electric Current मुळे Shock का लागतो?

Shock Voltage मुळे नाही, तर Electric Current शरीरातून वाहिल्यामुळे लागतो.

जेव्हा:

  • आपण live wire ला हात लावतो
  • आणि शरीरातून Current जमिनीकडे (Earth) जातो

तेव्हा Shock बसतो.

ओले हात, ओलसर जमीन किंवा नंगे पाय असतील तर Shock जास्त जोरात लागतो, कारण शरीराचा Resistance कमी होतो.
म्हणूनच Electric काम करताना Safety खूप महत्वाची असते.

What Is Magnetic Effect of Electric Current ?

Magnetic Effect of Electric Current म्हणजे जेव्हा एखाद्या conductor (तार) मधून electric current वाहतो, तेव्हा त्या conductor च्या भोवती magnetic field निर्माण होते. हा effect Electromagnetism या concept वर आधारित आहे. जर आपण एका straight wire मधून current पास केला आणि त्याच्या जवळ compass ठेवला, तर compass ची needle हलते यावरून आपल्याला कळते की current मुळे magnetic field तयार झाला आहे. या magnetic field ची direction समजण्यासाठी Right Hand Thumb Rule वापरला जातो.

हा effect practically खूप important आहे कारण याच principle वर Electromagnet, Electric Motor, Relay आणि Transformer सारखी devices काम करतात. जेव्हा wire ला coil करून त्यामध्ये current दिला जातो, तेव्हा strong magnetic field तयार होतो, ज्यामुळे Iron core magnet सारखा behave करतो यालाच Electromagnet म्हणतात. त्यामुळे Magnetic Effect of Electric Current हा electricity आणि magnetism यांना जोडणारा एक basic आणि powerful concept आहे, जो modern electrical technology चा पाया आहे.

Magnetic Effect of Electric Current चा शोध कोणी लावला?

इ.स. 1820 मध्ये Hans Christian Ørsted यांनी Magnetic Effect of Electric Current चा शोध लावला. त्यांनी पाहिलं की Current वाहणाऱ्या वायरजवळ ठेवलेली कंपासची सुई वळते आहे. यावरून Electric Current मुळे Magnetic Field तयार होतो हे सिद्ध झालं.

Magnetic Field म्हणजे काय?

Electric Current वाहणाऱ्या वायरच्या आजूबाजूला तयार होणाऱ्या अदृश्य क्षेत्राला Magnetic Field म्हणतात. या क्षेत्रात ठेवलेली चुंबकीय सुई किंवा लोखंडी वस्तू हालचाल करतात.

Conclusion

आजच्या या लेखात आपण Electric Current Flow कसा होतो या विषयावर संपूर्ण माहिती मीळवली आहे . Electric Current म्हणजे काय, तो वायरमधून कसा वाहतो, AC आणि DC Current मधील फरक, Current मोजण्याचं एकक, सूत्र आणि Ohm’s Law याबद्दल मूलभूत पण महत्वाची माहिती आपण या लेखामधून घेतलेली आहे. तसेच Electric Current मुळे Shock का लागतो आणि वीज वापरताना सुरक्षितता का गरजेची आहे हेही या लेखातून स्पष्ट सांगितले आहे.

Electric Current Flow कसा होतो हे समजल्यामुळे तुम्हाला फक्त Electric Current नॉलेज theory पुरतं न राहता प्रत्यक्ष वापरातही उपयोगी पडेल. घरगुती काम असेल किंवा basic electrical काम असेल, Electric Current ची योग्य माहिती असल्यास चुका होत नाहीत आणि सुरक्षितपणे वीज वापरता येते. हा लेख वाचल्यानंतर Electric Current बद्दलचा गोंधळ दूर झाला असेल आणी clear understanding तयार झालेली असेल.

Leave a Comment