Last Updated: 17 March 2026
Induction Motor in Marathi: आज अनेक electrical machines आणि industrial applications मध्ये Induction Motor हा सर्वात जास्त वापरला जाणारा motor प्रकार आहे. Fan, pump, compressor, conveyor system अशा अनेक ठिकाणी Induction Motor वापरली जाते. त्यामुळे electrical field मध्ये काम करणाऱ्या किंवा शिकणाऱ्या प्रत्येकाला Induction Motor बद्दल basic माहिती असणे आवश्यक आहे.
या लेखामध्ये आपण Induction Motor Meaning in Marathi म्हणजेच Induction Motor म्हणजे काय हे सविस्तर समजून घेणार आहे. त्यासोबत Induction Motor कशी work करते आणि motor start करताना कोणकोणते Starting Methods of Induction Motor वापरले जातात याची माहिती देखील पाहणार आहे.
Tip: हा लेख 17 मार्च 2026 मध्ये अपडेट करण्यात आला असून, यामध्ये नवीन technology आणि real-life उदाहरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.
Table of Contents
Induction Motor Meaning in Marathi
Induction Motor म्हणजे अशी electric motor ज्यामध्ये rotor मध्ये current थेट wire ने दिला जात नाही, तर तो magnetic field मुळे आपोआप तयार (induce) होतो. म्हणूनच या motor ला Induction Motor असे नाव दिले गेले आहे.
Induction Motor मध्ये मुख्य दोन भाग असतात Stator आणि Rotor.
- Stator हा motor चा बाहेरील भाग असतो ज्यामध्ये winding असते.
- Rotor हा motor च्या आत फिरणारा भाग असतो.
जेव्हा stator winding ला AC supply दिली जाते, तेव्हा stator मध्ये rotating magnetic field तयार होते. या magnetic field मुळे rotor मध्ये current तयार होतो. या प्रक्रियेला electromagnetic induction म्हणतात. Rotor मध्ये current तयार झाल्यानंतर rotor फिरायला सुरुवात करतो आणि motor चालू होते.
Induction Motor Working in Marathi
Induction Motor कशी काम करते हे खाली step by step समजून घेऊया. Motor सुरू झाल्यावर काय process होते ते पाहू.
1. Stator ला AC Supply दिली जाते
Induction Motor च्या stator winding ला जेव्हा AC supply दिली जाते, तेव्हा stator च्या coil मध्ये current वाहू लागतो. Current वाहू लागल्यानंतर stator मध्ये magnetic field तयार होतो. ही motor चालू होण्याची पहिली प्रक्रिया असते.
2. Rotating Magnetic Field तयार होतो
AC supply सतत बदलत असल्यामुळे stator मध्ये तयार होणारा magnetic field स्थिर राहत नाही, तो फिरत राहतो. या फिरणाऱ्या magnetic field ला Rotating Magnetic Field (RMF) म्हणतात. हा field rotor च्या भोवती सतत फिरत असतो.
3. Rotor मध्ये Current तयार होतो
Stator चा हा फिरणारा magnetic field जेव्हा rotor वर परिणाम करतो, तेव्हा rotor च्या conductor मध्ये current तयार होतो. हा current rotor ला direct supply देऊन तयार होत नाही, तर magnetic field मुळे आपोआप तयार होतो. म्हणूनच या motor ला Induction Motor असे नाव आहे.
4. Rotor फिरायला सुरुवात करते
Rotor मध्ये current तयार झाल्यानंतर rotor आणि stator च्या magnetic field मध्ये force तयार होतो. या force मुळे rotor फिरायला सुरुवात करतो. सुरुवातीला rotor हळू फिरतो आणि नंतर त्याचा speed वाढत जातो.
5. Mechanical Power तयार होते
Rotor फिरू लागल्यानंतर motor mechanical power तयार करते. ही power पुढे fan, water pump, compressor, conveyor अशा अनेक machines चालवण्यासाठी वापरली जाते.
Starting Methods of Induction Motor
Induction Motor सुरू करताना full voltage दिल्यावर motor खूप जास्त starting current घेते. काही वेळा हा current normal current पेक्षा 5 ते 7 पट जास्त असू शकतो. त्यामुळे electrical system वर load येऊ शकतो आणि wiring किंवा equipment खराब होऊ शकतात. खाली काही Starting Methods दिलेले आहेत.
1. Direct On Line (DOL) Starter
DOL Starter Induction Motor सुरू करण्याची सर्वात simple method आहे. या पद्धतीमध्ये motor ला direct full voltage supply दिली जाते.
हा starter साधारणपणे small motors साठी वापरला जातो. DOL starter मध्ये contactor, overload relay आणि push buttons असतात. Motor start करताना हा starter protection पण देतो. DOL Starter बद्दल आधिक माहिती तुम्ही माझ्या Three Phase DOL Starter in Marathi या ब्लॉगमध्ये पाहू शकता.
2. Star Delta Starter
Star Delta Starter हा medium power motors साठी जास्त वापरला जाणारा Starter आहे. या पद्धतीमध्ये motor सुरुवातीला star connection मध्ये start होते.
Star connection मुळे motor ला कमी voltage मिळते आणि starting current कमी होतो. काही वेळानंतर motor delta connection मध्ये बदलते आणि motor full power ने काम करू लागते.
3. Auto Transformer Starter
Auto Transformer Starter मोठ्या motors साठी वापरला जातो. या पद्धतीमध्ये motor ला सुरुवातीला reduced voltage दिले जाते.
Motor थोडी speed मिळवल्यानंतर नंतर full voltage supply दिली जाते. त्यामुळे starting current कमी राहतो आणि motor smooth पद्धतीने start होते. Auto Transformer Starter या विषयवरती आधिक माहिती What is an Autotransformer Starter या ब्लॉगमध्ये पाहू शकता.
4. Soft Starter
Soft Starter हा modern starting method Starter आहे. या device च्या मदतीने motor ला voltage हळूहळू दिले जाते.
यामुळे motor अचानक start होत नाही, तर smooth start मिळतो. त्यामुळे mechanical parts वर ताण कमी येतो आणि motor ची life वाढते.
Induction Motor Applications in Marathi (Latest Updated 2026)
Induction Motor ही आजच्या काळातील सर्वात जास्त वापरली जाणारी electric motor आहे. 2026 पर्यंत automation आणि smart technology वाढल्यामुळे याचा वापर अधिक प्रमाणात वाढत आहे.
1. Industrial Applications (उद्योगांमध्ये वापर)
Induction Motor चा सर्वाधिक वापर industries मध्ये होतो. Conveyor belt, pumps, compressors आणि machine tools चालवण्यासाठी ही motor वापरली जाते. नवीन automation systems मध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
2. Electric Vehicles (EV)
आजकाल electric vehicles (EV) मध्ये induction motor चा वापर वाढत आहे. High efficiency आणि कमी maintenance मुळे EV sector मध्ये ही motor popular होत आहे.
3. Smart Home Appliances
Washing machine, fan, refrigerator, air conditioner यांसारख्या smart appliances मध्ये induction motor वापरली जाते. नवीन inverter technology मुळे energy saving जास्त होते.
4. Agriculture (शेतीमध्ये वापर)
Water pump, irrigation system आणि borewell pumps मध्ये induction motor मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. Rural areas मध्ये ही motor खूप महत्त्वाची आहे.
5. Renewable Energy Systems
Solar power systems आणि wind energy मध्ये देखील induction motor चा वापर होत आहे. Future मध्ये green energy सोबत याचा वापर अजून वाढणार आहे.
6. HVAC Systems
Heating, Ventilation आणि Air Conditioning (HVAC) systems मध्ये induction motor essential component आहे, ज्यामुळे cooling आणि airflow control केला जातो.
Induction Motor Real Life Advantages in Marathi
Induction Motor ही आपल्या रोजच्या जीवनात खूप महत्त्वाची electric motor आहे. घरात असो किंवा industry मध्ये ही motor जवळपास सर्व जागी वापरली जाते. तिचे काही practical फायदे खाली दिलेले आहेत.
1. Low Maintenance
Induction Motor मध्ये brush किंवा commutator नसतात, त्यामुळे friction कमी होते आणि parts लवकर खराब होत नाहीत. यामुळे वारंवार servicing किंवा repair करण्याची गरज लागत नाही. घरगुती fan, washing machine किंवा water pump अनेक वर्षे कोणत्याही मोठ्या maintenance शिवाय चालतात.
2. Strong & Durable
ही motor खूप मजबूत बनवलेली असते, त्यामुळे ती कठीण परिस्थितीतही चांगले काम करते. धूळ, उष्णता किंवा heavy load असतानाही तिचा performance stable राहतो. म्हणूनच industries आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या induction motors अनेक वर्षे कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय टिकून राहतात.
3. Easy to Use
Induction Motor चालवण्यासाठी कोणतीही complex system लागत नाही. switch ON केल्यावर motor लगेच सुरू होते, त्यामुळे कोणालाही ती वापरणे सोपे जाते. fan, AC किंवा refrigerator सारखी उपकरणे आपण फक्त चालू करतो आणि ती लगेच काम सुरू करतात.
4. Best for Automation
Automation मध्ये induction motor खूप उपयुक्त आहे. VFD सारख्या technology च्या मदतीने तिचा speed आणि performance control करता येतो. त्यामुळे smart machines आणि automated systems मध्ये तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. VFD कसे काम करते हे जाणून घेण्यासाठी VFD Working Principle In Marathi हा लेख वाचा.
5. Safe Operation
Induction Motor मध्ये spark होत नाही आणि जास्त heat निर्माण होत नाही, त्यामुळे ती वापरण्यास सुरक्षित असते. यामुळे fire किंवा accident होण्याचा धोका कमी असतो. घरातील appliances मध्ये ही motor सुरक्षितपणे वापरली जाते, त्यामुळे ती daily use साठी best मानली जाते.
6. Self Starting
Induction Motor सुरू करण्यासाठी वेगळ्या starting system ची गरज नसते. switch ON केल्यावर motor आपोआप सुरू होते, त्यामुळे user ला कोणतीही extra प्रक्रिया करावी लागत नाही. fan किंवा water pump वापरताना ही गोष्ट खूप सोयीची ठरते.
7. Affordable
Induction Motor ची किंमत इतर motors पेक्षा कमी असते आणि maintenance cost पण कमी असतो. त्यामुळे long-term मध्ये user ला जास्त फायदा होतो. small business, शेती आणि घरगुती वापरासाठी ही motor एक economical आणि practical option आहे.
9. Low Noise
Induction Motor चालताना जास्त आवाज करत नाही, त्यामुळे ती घरगुती वापरासाठी खूप योग्य आहे. fan किंवा AC चालू असताना शांतपणे काम करतात, त्यामुळे noise pollution कमी होते आणि आरामदायी वातावरण तयार होते.
10. Energy Efficient
Induction Motor कमी वीज वापरून जास्त output देते, त्यामुळे energy saving होते. यामुळे घरगुती तसेच industrial वापरात electricity bill कमी ठेवण्यास मदत होते. आजकाल inverter technology सोबत induction motor वापरल्यामुळे अजून जास्त energy efficient systems तयार झाले आहेत.
3 Phase Induction Motor in Marathi
Three‑phase induction motor ही industry मध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी electric motor आहे. या motor ला चालण्यासाठी 3 phase AC supply लागते. Factories, workshop, water pump, compressor, conveyor system अशा अनेक ठिकाणी 3 Phase Induction Motor वापरली जाते. Three phase Motor Connection बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर 3 Phase Motor Star Connection in Marathi हा लेख जरूर वाचा.
या motor मध्ये तीन phase ची supply stator winding ला दिली जाते. ही supply मिळाल्यानंतर stator मध्ये rotating magnetic field तयार होतो. हा magnetic field rotor वर परिणाम करतो आणि rotor फिरायला सुरुवात करतो. त्यामुळे motor चालू होते.
याशिवाय 3 Phase Induction Motor ची efficiency जास्त असते आणि ती heavy load सहज हाताळू शकते. त्यामुळे production machines, मोठे pumps, cranes, lifts आणि conveyor systems मध्ये ही motor जास्त वापरली जाते.
3 Phase Induction Motor Connection Diagram

Single Phase Induction Motor in Marathi
Single-phase induction motor ही अशी electric motor आहे जी single phase AC supply वर चालते. ही motor प्रामुख्याने घरगुती Device आणि small machines मध्ये वापरली जाते. कारण घरांमध्ये single phase electricity supply असतो.
या motor चे वैशिष्ट्य म्हणजे ही motor स्वतःहून start होत नाही. म्हणजेच फक्त single phase supply दिल्यावर rotor लगेच फिरायला सुरुवात करत नाही. त्यामुळे motor start करण्यासाठी capacitor, auxiliary winding किंवा starting winding वापरली जाते.
Single Phase Induction Motor साधारणपणे fan, water pump, washing machine, mixer, air cooler अशा घरगुती Device मध्ये वापरली जाते.
Single Phase Induction Motor Connection Diagram

Induction Motor vs Synchronous Motor
| Feature | Induction Motor | Synchronous Motor |
|---|---|---|
| Principle | Works on electromagnetic induction | Works on magnetic locking between rotor and stator field |
| Rotor Speed | Rotor speed is always less than synchronous speed (has slip) | Rotor speed is exactly equal to synchronous speed |
| Starting | Self-starting motor | Not self-starting |
| Rotor Current | Current is induced in rotor automatically | Rotor needs external DC supply |
| Construction | Simple and rugged construction | More complex construction |
| Maintenance | Requires less maintenance | Requires more maintenance |
| Cost | Comparatively cheaper | More expensive |
| Applications | Fans, pumps, compressors, conveyors | Power factor correction, constant speed applications |
FAQ’s
Induction Motor मध्ये Slip म्हणजे काय?
Induction Motor मध्ये stator च्या magnetic field चा speed आणि rotor चा actual speed यात जो फरक असतो त्याला Slip म्हणतात. Motor चालण्यासाठी slip असणे आवश्यक असते. जर slip शून्य झाला तर rotor मध्ये current तयार होणार नाही आणि motor काम करणार नाही.
Induction Motor self starting का असते?
Induction Motor मध्ये AC supply मुळे rotating magnetic field तयार होते. ही magnetic field rotor मध्ये current तयार करते त्यामुळे rotor आपोआप फिरायला सुरुवात करतो. त्यामुळे ही motor बहुतेक वेळा self-starting motor म्हणून ओळखली जाते.
Induction Motor मध्ये Rotor Copper चा का बनवतात?
Rotor मध्ये current चांगल्या प्रकारे वाहण्यासाठी copper किंवा aluminium conductor वापरले जातात. हे metals electrical current सहज वाहू देतात.
Conclusion
या लेखामध्ये आपण Induction Motor बद्दल सर्व सविस्तर माहिती पाहिली. सर्वप्रथम Induction Motor Meaning in Marathi म्हणजे Induction Motor म्हणजे काय हे समजून घेतले. त्यानंतर Induction Motor Working in Marathi म्हणजे ही motor नेमकी कशी काम करते हे जाणून घेतले. तसेच motor सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी वापरले जाणारे वेगवेगळे starting methods देखील पाहिले.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की Induction Motor ही electrical field मधील सर्वात उपयोगी आणि जास्त वापरली जाणारी motor आहे. तिचे काम करण्याचे तत्त्व सोपे आहे आणि त्यामुळेच ती fan, pump, compressor आणि अनेक industrial machines मध्ये वापरली जाते. त्यामुळे Induction Motor बद्दल basic माहिती असणे electrical विषयी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे.











