Star Delta Starter Working Principle Marathi | Star Delta Starter Information in Marathi 2026

Star Delta Starter Information in Marathi: Electrical field मध्ये 3 Phase motor चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण motor चालू करताना खूप जास्त current (starting current) घेतला जातो, ज्यामुळे motor च्या winding ला नुकसान होऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठी Star Delta Starter वापरला जातो.

या ब्लॉगमध्ये आपण Star Delta Starter Working Principle Marathi या विषयावरती सविस्तर माहिती घेणार आहे. Star Delta Starter नेमका कसा काम करतो, motor ला सुरुवातीला Star connection मध्ये का जोडले जाते आणि काही वेळाने Delta connection मध्ये का बदलले जाते, हे आपण step-by-step समजून घेऊ.

What is Star Delta Starter in Marathi

Star Delta Starter म्हणजे 3 Phase induction motor सुरक्षित पने सुरू करण्यासाठी वापरला जाणारा एक electrical starter आहे. Motor सुरू होताना सुरुवातीला खूप जास्त starting current घेतला जातो. हा current कमी करण्यासाठी Star Delta Starter वापरला जातो.

यामध्ये motor ला सुरुवातीला Star connection मध्ये जोडले जाते. त्यामुळे प्रत्येक winding वर कमी voltage येते आणि starting current कमी होतो. Motor काही सेकंदांनी योग्य speed ला पोहोचली की connection आपोआप Delta connection मध्ये बदलले जाते.

Delta मध्ये motor पूर्ण voltage वर चालू लागते आणि full load वर काम करू शकते. 1 HP, 2 HP सारख्या लहान motor साठी Star Delta Starter वापरत नाहीत. त्यासाठी DOL Starter वापरला जातो DOL Starter बद्दल डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर Three Phase DOL Starter in Marathi हा ब्लॉग वाचू शकता.

Star Delta Starter Power Diagram

Star Delta Starter Power Diagram
Star Delta Starter Power Diagram for 3 Phase Induction Motor

Star Delta Starter Working Principle Marathi

जेव्हा आपण motor सुरू करतो, तेव्हा सुरुवातीला motor ला Star connection मध्ये जोडले जाते. Star connection मध्ये प्रत्येक winding ला कमी voltage मिळते (Line voltage च्या सुमारे 58%). त्यामुळे motor कमी current घेते आणि supply line वर ताण येत नाही.

नंतर Timer काही सेकंदांनी connection Delta connection मध्ये बदलतो. Delta connection मध्ये motor ला पूर्ण line voltage मिळते आणि ती full load वर व्यवस्थित काम करू लागते.

या प्रोसेसमध्ये तीन Contactor (Main, Star, Delta) आणि एक Timer काम करतात. Starting ला Main आणि Star contactor ON असतात. Timer पूर्ण झाल्यावर Star OFF होतो आणि Delta ON होतो.

Star Delta Connection in Marathi

Star Delta Connection म्हणजे 3 Phase motor च्या winding ला दोन वेगवेगळ्या पद्धतीने जोडण्याची पद्धत आहे. एक म्हणजे Star connection (Y) आणि दुसरी Delta connection (Δ). ही दोन्ही connection motor च्या performance आणि starting पद्धतीवर परिणाम करतात.

Star Connection म्हणजे काय?

Star connection मध्ये motor च्या तीन winding च्या एक-एक टोकांना एकत्र जोडले जाते आणि उरलेल्या तीन टोकांना supply (R, Y, B) दिली जाते. यामध्ये प्रत्येक winding वर कमी voltage येतो. त्यामुळे current कमी घेतला जातो. हे connection प्रामुख्याने motor सुरू करताना वापरले जाते.

Delta Connection म्हणजे काय?

Delta connection मध्ये winding एकमेकांना गोलाकाlर (triangle) पद्धतीने जोडल्या जातात. म्हणजे एका winding चा शेवट दुसऱ्याच्या सुरुवातीला जोडला जातो. या पद्धतीत प्रत्येक winding ला पूर्ण line voltage मिळतो. त्यामुळे motor full speed आणि full load वर काम करू शकते.

Star Delta Starter Connection Diagram

Star Delta Starter Connection Diagram
Star Delta Starter Connection Diagram for 3 Phase Motor

Star Delta Starter Applications in Marathi

Star Delta Starter प्रामुख्याने अशा ठिकाणी वापरला जातो जिथे 3 Phase motor ची capacity जास्त असते (साधारणपणे 5 HP पेक्षा मोठी) आणि direct start केल्यास जास्त starting current येण्याची शक्यता असते. Industrial area मध्ये मोठे water pumps, air compressors, conveyor systems, blower, crusher machines आणि heavy production machines साठी हा starter मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

कारण अशा motors सुरू करताना supply line वर ताण येऊ शकतो आणि voltage drop होऊ शकते. Star Delta Starter motor ला सुरुवातीला कमी current मध्ये सुरक्षितपणे सुरू करतो आणि नंतर full load वर चालू करतो. त्यामुळे motor ची life वाढते, wiring सुरक्षित राहते आणि पूर्ण electrical system stable राहते.

Star Delta Starter Vs DOL Starter in Marathi

Point of DifferenceStar Delta StarterDOL (Direct Online) Starter
Starting MethodStarts motor in Star connection and then shifts to Delta connectionStarts motor directly with full line voltage
Starting CurrentLow starting current (around 2 to 3 times full load current)High starting current (around 6 to 8 times full load current)
Starting TorqueLow starting torqueHigh starting torque
Motor CapacitySuitable for medium and large motors (usually above 5 HP)Suitable for small motors (generally up to 5 HP)
Number of ContactorsUses 3 Contactors (Main, Star, Delta) + TimerUses 1 Contactor + Overload Relay
CostMore expensive due to extra componentsLess expensive and simple design
Wiring ComplexityMore complex wiringSimple and easy wiring
Application AreaUsed in industries for pumps, compressors, conveyorsUsed in small workshops, homes, small pumps
Voltage Drop EffectReduces voltage drop during startingMay cause voltage drop during starting
Protection LevelBetter control during startingBasic motor protection

FAQ’s

Star Delta Starter मध्ये Timer fail झाला तर काय होईल?

जर Timer काम करत नसेल तर motor Star मध्येच राहू शकते किंवा Delta मध्ये shift होणार नाही. त्यामुळे motor full speed ला पोहोचणार नाही किंवा contactor damage होऊ शकतो.

Star Delta Starter कोणत्या motor साठी वापरता जातो?

Star Delta Starter फक्त 6 terminal असलेल्या 3 Phase induction motor साठीच वापरता येतो. Motor च्या terminal box मध्ये U1, V1, W1 आणि U2, V2, W2 असे सहा terminals असणे आवश्यक आहे.

Star Delta Starter मध्ये interlocking का आवश्यक असते?

Star Delta Starter मध्ये Electrical आणि Mechanical interlocking वापरले जाते जेणेकरून Star आणि Delta contactor एकाच वेळी ON होऊ नयेत. दोन्ही एकत्र ON झाले तर short circuit होऊ शकते.

Conclusion

या ब्लॉगमध्ये आपण Star Delta Starter Working Principle Marathi अगदी सोप्या भाषेत समजून घेतले. Motor सुरू करताना जास्त starting current येतो, तो कमी करण्यासाठी Star connection मध्ये सुरुवात करून नंतर Delta connection मध्ये बदल केला जातो, हे आपण स्पष्टपणे पाहिले.

तसेच What is Star Delta Starter in Marathi यामधून आपण हे शिकलो की हा starter मोठ्या 3 Phase motor साठी वापरला जातो आणि तो motor ला सुरक्षित, smooth आणि कमी current मध्ये सुरू करण्यास मदत करतो. थोडक्यात सांगायचं तर, Star Delta Starter म्हणजे motor ची safety, performance आणि long life यासाठी वापरली जाणारी एक starting पद्धत आहे.

Leave a Comment