Working Principle of Motor Protection Circuit Breaker (MPCB) in Marathi | MPCB Information in Marathi 2026

MPCB Information in Marathi: Industrial क्षेत्रात किंवा लहान-मोठ्या उद्योगांमध्ये motor सुरक्षितपणे चालवणे खूप महत्त्वाचे असते. Motor मध्ये overload, short circuit किंवा phase failure सारख्या समस्या आल्या तर मोठे नुकसान होऊ शकते. अशा वेळी motor चे संरक्षण करण्यासाठी Motor Protection Circuit Breaker (MPCB) वापरला जातो.

या ब्लॉगमध्ये आपण Working Principle of Motor Protection Circuit Breaker, MPCB कसा काम करतो, Thermal आणि magnetic protection म्हणजे काय, MPCB ची setting कशी करायची या सर्व तुमच्या question वरती सविस्तर माहिती घेणार आहे. जर तुम्ही electrician, industrial worker किंवा electrical field मध्ये काम करणारे असाल, तर हा लेख तुम्हाला MPCB बद्दल संपूर्ण माहिती देईल.

What is Motor Protection Circuit Breaker (MPCB)

Motor Protection Circuit Breaker म्हणजेच MPCB हा एक circuit breaker आहे जो electric motor चे पूर्ण protection करण्यासाठी design केलेला असतो. साधा MCB फक्त short circuit आणि काही प्रमाणात overload पासून संरक्षण देतो, पण motor मध्ये येणाऱ्या खास problems जसे की overload, short circuit, phase failure, phase imbalance यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी MPCB वापरला जातो. त्यामुळे industrial panel मध्ये motor साठी MPCB खूप महत्त्वाचा component मानला जातो.

Motor चालू असताना कधी कधी जास्त current (overload) घेतला जातो, wiring मध्ये fault झाला तर short circuit होतो किंवा तीन phase पैकी एक phase गेला तर motor गरम होऊ लागते. अशा वेळी MPCB लगेच trip होतो आणि motor चा power supply बंद करतो. त्यामुळे motor coil जळणे, winding damage होणे टाळता येते. म्हणजेच MPCB हा motor साठी एक protective shield सारखा काम करतो.

Working Principle of Motor Protection Circuit Breaker (MPCB)

Motor Protection Circuit Breaker (MPCB) कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी आधी motor मध्ये कोणकोणते faults येऊ शकतात हे समजणे गरजेचे आहे. Motor चालू असताना overload, short circuit, phase failure किंवा phase imbalance अशा समस्या येऊ शकतात. MPCB चे working principle म्हणजेच त्याचे काम करण्याचे तत्त्व असे आहे की, motor मध्ये abnormal current flow झाला की तो लगेच ओळखतो आणि supply बंद करून motor ला protect करतो.

Current Monitoring System

MPCB सतत motor मधून जाणारा current monitor करत असतो. Motor सुरू असताना ती normal current घेते, पण जर load वाढला किंवा fault झाला तर current अचानक वाढतो. MPCB च्या आत special sensing mechanism असतो जो हा बदल ओळखतो. जसेच current safe limit पेक्षा जास्त झाला, MPCB लगेच react होण्यासाठी तयार होतो.

Thermal Protection (Overload Protection)

Motor वर जास्त load आला तर तो जास्त current घेतो. हा current काही वेळ सतत जास्त राहिला तर motor गरम होऊ लागतो. MPCB मध्ये bimetal strip असते जी जास्त current मुळे गरम होते. ती गरम होऊन वाकते आणि trip mechanism चालू करते. त्यामुळे circuit break होते आणि motor बंद होते.

Magnetic Protection (Short Circuit Protection)

Short circuit झाल्यावर current खूप जास्त प्रमाणात आणि अचानक वाढतो. अशा वेळी MPCB मधील magnetic coil लगेच activate होते. Magnetic field तयार होऊन trip mechanism instant काम करतो. हे protection millisecond मध्ये काम करते आणि motor तसेच wiring दोन्हीचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.

Phase Loss Protection (Three Phase Motor साठी)

Three phase motor मध्ये जर एक phase गेला तर motor imbalance मध्ये चालते आणि खूप गरम होतो. MPCB हा imbalance detect करून motor supply बंद करतो. यामुळे motor burn होण्याचा धोका टळतो. Industrial use मध्ये हे protection खूप महत्वाचे आहे.

Adjustable Current Setting

MPCB मध्ये current setting adjust करण्यासाठी knob असतो. Motor च्या nameplate वर दिलेल्या rated current प्रमाणे setting केली जाते. योग्य setting केल्यास MPCB फक्त fault च्या वेळीच trip होतो आणि unnecessary trip टाळता येतो.

Read Related Article: Type of Relay In Marathi

Types Of Motor MPCB In Marathi

Motor Protection Circuit Breaker (MPCB) वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध असतो. Motor चा type, load आणि application पाहून योग्य MPCB निवडला जातो. खाली दिलेले प्रकार industrial panel मध्ये सर्वात जास्त वापरले जातात.

1. Thermal Magnetic MPCB

हा सर्वात common आणि जास्त वापरला जाणारा MPCB प्रकार आहे. यात thermal protection आणि magnetic protection दोन्ही असतात.

  • Thermal part overload साठी काम करतो. Motor जास्त load घेत असेल तर bimetal strip गरम होऊन काही वेळाने trip करतो.
  • Magnetic part short circuit साठी काम करतो. अचानक current खूप वाढला तर लगेच trip होतो.

हा प्रकार small आणि medium industries मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. Simple design, कमी maintenance आणि reliable protection ही त्याची खासियत आहे.

2. Electronic MPCB

Electronic MPCB हा advanced type आहे. यात traditional bimetal ऐवजी electronic sensing circuit वापरला जातो. Current sensors आणि microprocessor system fault detect करतात.

  • Overload, short circuit, phase loss आणि phase imbalance अचूकपणे detect करतो.
  • Setting जास्त precise करता येते.
  • काही models मध्ये digital display आणि communication feature देखील असतात.

Large industries, automation system आणि sensitive equipment साठी Electronic MPCB जास्त योग्य असतो. किंमत जास्त असली तरी protection high level चे मिळते.

3. Adjustable MPCB

Adjustable MPCB मध्ये current setting manually adjust करता येते. Motor च्या rated current प्रमाणे knob फिरवून setting केली जाते.

  • एकाच MPCB ला वेगवेगळ्या motor साठी वापरता येते.
  • Future मध्ये motor change केली तरी पूर्ण breaker बदलण्याची गरज नसते.

Industrial panel मध्ये हा प्रकार जास्त practical मानला जातो कारण flexibility मिळते आणि cost saving होते.

4. Fixed MPCB

Fixed MPCB मध्ये current rating fix असते. Setting बदलता येत नाही.

  • Specific motor साठीच design केलेला असतो.
  • Simple application आणि small load साठी वापरला जातो.
  • Cost थोडी कमी असतो.

Small machines, pumps आणी fixed load system साठी हा प्रकार योग्य असतो. MPCB च्या function वरती डिटेल माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही motor-protection-circuit-breaker हे आर्टिकल वाचू शकता.

Applications of MPCB In Marathi

Motor Protection Circuit Breaker (MPCB) हा फक्त एक circuit breaker नसून motor साठी पूर्ण protection देणारा महत्त्वाचा device आहे. जिथे जिथे electric motor वापरली जाते, तिथे तिथे MPCB चा वापर केला जातो. खाली काही त्याचे प्रमुख उपयोग दिले आहेत.

Industrial Control Panel मध्ये वापर

Factories आणि industries मध्ये वेगवेगळ्या machines चालवण्यासाठी motor वापरली जाते. प्रत्येक motor साठी overload आणि short circuit protection गरजेचे असते. त्यामुळे control panel मध्ये contactor सोबत MPCB बसवला जातो. यामुळे motor सुरक्षित राहते आणि production थांबण्याचा धोका कमी होतो.

Water Pump System

Agriculture, society, building आणि borewell pump system मध्ये motor सतत चालू-बंद होत असते. कधी dry run किंवा overload झाला तर motor जळण्याची शक्यता असते. MPCB अशा वेळी trip होऊन pump motor चे संरक्षण करतो.

Compressor आणि HVAC System

Air compressor, refrigeration unit आणि HVAC (Heating, Ventilation and Air Conditioning) system मध्ये motor खूप महत्वाची असते. Load अचानक वाढू शकतो. MPCB overload आणि phase failure पासून motor चे protection करतो. Commercial building आणि mall मध्ये हा MPCB मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

Conveyor System

Manufacturing unit मध्ये conveyor belt सतत चालू असतो. जर belt jam झाला तर motor वर अचानक load वाढतो. MPCB लगेच overload detect करून motor बंद करतो. यामुळे मशीन आणि material दोन्ही सुरक्षित राहतात.

Small Machines आणि Workshop Equipment

Lathe machine, drilling machine, cutting machine यांसारख्या workshop equipment मध्ये देखील MPCB वापरला जातो. Small industry आणि garage मध्ये motor protection साठी हा सोपा आणि effective उपाय आहे.

Automation आणि Process Industry

Large automation system आणि process industry मध्ये motor खूप critical असते. Continuous operation असल्यामुळे protection मजबूत असणे गरजेचे असते. Electronic MPCB इथे जास्त वापरला जातो कारण तो accurate protection देतो.

Difference Between MPCB Vs Overload Relay

FeatureMPCB (Motor Protection Circuit Breaker)Overload Relay
PurposeMotor ला overload, short circuit आणि phase failure पासून protection देतोफक्त overload protection देतो
Short Circuit Protectionहो, inbuilt magnetic protection असतेनाही, short circuit साठी वेगळा MCB/MCCB लागतो
Overload Protectionहो, thermal protection असतेहो, मुख्य काम overload protection आहे
Phase Loss Protectionबहुतेक MPCB मध्ये असतेकाही models मध्ये असते, पण limited
Contactor ची गरजDirect ON/OFF साठी वापरता येतो, पण contactor सोबतही वापरतातनेहमी contactor सोबतच वापरावा लागतो
Current SettingAdjustable knob असतो (rated range मध्ये)Adjustable setting असते
Breaking Capacity (kA Rating)High breaking capacity असतेBreaking capacity नसते (circuit break करत नाही)
Installation PlacePanel मध्ये main motor protection device म्हणूनContactor च्या खाली बसवला जातो
Costतुलनेने महागकमी किंमतीत उपलब्ध
ApplicationComplete motor protection साठीफक्त overload safety साठी

FAQ’s

MPCB motor start होताना का trip होतो?

Motor start होताना inrush current जास्त असतो (rated current पेक्षा 5 ते 7 पट). जर MPCB ची setting कमी असेल किंवा चुकीची selection केली असेल तर तो starting current ला fault समजून trip होऊ शकतो.

MPCB आणि Overload Relay दोन्ही एकत्र का वापरतात?

काही industrial panel मध्ये MPCB असूनही वेगळा overload relay वापरला जातो. कारण काही heavy duty application मध्ये अधिक accurate protection हवे असते. MPCB basic protection देतो, पण overload relay अधिक fine tuning Protection देतो.

MPCB contactor शिवाय वापरता येतो का?

हो, लहान application मध्ये direct ON/OFF साठी वापरता येतो. पण frequent starting असेल किंवा remote control हवा असेल तर contactor सोबत वापरणे योग्य ठरते.

Conclusion

या ब्लॉगमध्ये आपण Working Principle of Motor Protection Circuit Breaker या विषयावर डीटेल माहिती समजून घेतली. MPCB motor मधील current सतत monitor करतो आणि overload, short circuit किंवा phase problem आल्यावर लगेच trip होऊन motor चे संरक्षण करतो, हे आपण पाहिले. Thermal आणि magnetic protection कसे काम करतात, तसेच योग्य setting का महत्वाची आहे हेही समजले.

तसेच आपण Types Of Motor MPCB In Marathi देखील पाहिले. Thermal Magnetic MPCB, Electronic MPCB, Adjustable आणि Fixed MPCB यामधला फरक समजून घेतला. कोणता प्रकार कुठे वापरावा आणि industrial application नुसार योग्य निवड कशी करावी हेही स्पष्ट झाले. Electrical field मध्ये काम करणाऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल.

Leave a Comment