Contactor Working Principle In Marathi | Contactor म्हणजे काय आणि तो कसा काम करतो ?

Last Updated: 28 March 2026

Contactor In Marathi: आजच्या modern electrical systems मध्ये Contactor हा एक अतिशय महत्वाचा switching device आहे, जो industrial machines, motors आणि automation systems मध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पण Contactor म्हणजे काय? तो कसा काम करतो? आणि electrical control systems मध्ये त्याची भूमिका अनेकांना नीट समजत नाही.

या लेखामध्ये आपण Contactor Working Principle In Marathi आणी Types of Contactor In Marathi या विषयावर सविस्तर माहिती समजून घेणार आहे. Contactor म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, तो step-by-step कसा काम करतो, त्याचे प्रकार, उपयोग, connection, तसेच relay आणि contactor मधील फरक ही सर्व माहिती तुम्हाला इथे clear आणि practical example सोबत मिळेल. जर तुम्हाला electrician, student किंवा electrical field मध्ये interest असेल, तर हा ब्लॉग तुम्हाला Contactor बद्दल complete आणि easy माहिती देईल.

Tip: हा लेख 28 मार्च 2026 मध्ये अपडेट करण्यात आला असून, यामध्ये नवीन technology आणि real-life उदाहरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.

What is a contactor In Marathi (Contactor म्हणजे काय)

Contactor हा एक electrical switching device आहे, जो मोठ्या power असलेल्या electrical circuits ला ON-OFF करण्यासाठी वापरला जातो. साध्या भाषेत सांगायचं तर, Contactor म्हणजे असा एक automatic switch आहे जो remote control ने किंवा electrical signal मिळाल्यावर heavy load (जसे motor, industrial machines, lighting systems) चालू किंवा बंद करतो.

आपण घरात light चालू-बंद करण्यासाठी manual switch वापरतो, पण factories किंवा industries मध्ये खूप मोठ्या power चे motors आणि machines असतात. ते manually switch करणे safe आणि practical नसते. अशा वेळी Contactor वापरला जातो, कारण तो high current safely handle करू शकतो आणि control panel मधून सहज operate करता येतो.

मोठ्या motors चा starting current कमी करण्यासाठी contactor चा वापर Star Delta Starter मध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. Star-Delta connection समजून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Contactor Working Principle In Marathi (Contactor कसा काम करतो)

Contactor Working Principle समजून घेण्यासाठी आधी एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा Contactor हा electromagnetism या तत्त्वावर काम करतो. म्हणजेच, जेव्हा coil मधून current flow होतो तेव्हा magnetic field तयार होते आणि त्याच्या मदतीने contacts open किंवा close होतात.

खाली Step-By-Step Process समजून घेऊया:

  1. Coil ला supply दिल्यावर magnetic field तयार होते
    Contactor मध्ये एक electromagnetic coil असते. जेव्हा coil ला electrical supply दिली जाते, तेव्हा ती coil magnet सारखी behave करते आणि magnetic field तयार करते.
  2. Moving contacts attract होतात
    हा magnetic force contactor मधील moving contact ला स्वतःकडे खेचतो. त्यामुळे moving contact आणि fixed contact एकमेकांना touch होतात.
  3. Circuit complete होतो आणि load ON होतो
    Contacts एकमेकांना लागल्यामुळे circuit complete होतो आणि motor, machine किंवा lighting system सारखा load चालू होतो.
  4. Supply बंद केल्यावर contacts परत open होतात
    जेव्हा coil ला दिलेला supply बंद केला जातो, तेव्हा magnetic force नाहीसा होतो. आत असलेली spring moving contact ला परत मागे ढकलते आणि contacts वेगळे होतात.
  5. Circuit break होतो आणि load OFF होतो
    Contacts open झाल्यावर current flow थांबतो आणि connected device बंद होतात.

Types of Contactor In Marathi

Electrical system मध्ये वापरल्या जाणाऱ्या Contactor चे प्रकार वेगवेगळ्या supply, voltage level आणि application नुसार बदलतात. प्रत्येक contactor विशिष्ट कामासाठी design केलेला असतो, त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य प्रकार वापरणे खूप महत्वाचे असते. खाली काही Contactor चे प्रकार detail मध्ये दिलेले आहेत.

Contactor आणि Circuit Breaker हे दोन्ही electrical protection आणि control साठी वापरले जातात, पण त्यांचे काम वेगळे असते. Circuit Breaker कसा काम करतो हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

1. AC Contactor

AC supply (Alternating Current) वर चालणाऱ्या electrical devices control करण्यासाठी AC Contactor वापरला जातो. Industries मध्ये motors, compressors, pumps, HVAC systems आणि lighting control साठी हा सर्वात जास्त वापरला जाणारा contactor आहे.

AC current सतत direction बदलत असल्यामुळे switching करताना arc तयार होतो, पण AC Contactor मध्ये arc control करण्यासाठी special arc chute आणि design दिलेले असते. हा contactor high current safely handle करू शकतो आणि continuous operation साठी reliable असतो, म्हणून industrial motor control मध्ये याचा वापर खूप common आहे.

2. DC Contactor

DC supply (Direct Current) control करण्यासाठी DC Contactor वापरला जातो. DC current सतत एकाच direction ने flow होत असल्यामुळे switching करताना arc जास्त वेळ टिकतो आणि जास्त powerful असतो. त्यामुळे DC Contactor मध्ये arc extinguishing system जास्त मजबूत असते.

हा contactor battery systems, solar power systems, electric vehicles आणि DC motors control करण्यासाठी वापरला जातो. DC circuit मध्ये safety maintain करण्यासाठी DC Contactor वापरला जातो.

3. Magnetic Contactor

Electromagnetic principle वर काम करणारा contactor म्हणजे Magnetic Contactor. यात electromagnetic coil असते. Coil ला supply दिल्यावर magnetic field तयार होतो आणि moving contact fixed contact ला touch करतात, त्यामुळे circuit complete होतो.

Supply बंद केल्यावर spring contact पुन्हा open होतो. हा contactor motor starters, industrial automation panels आणि heavy load switching साठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. Fast switching, remote control operation आणि reliable performance यामुळे हा प्रकार industries मध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. Magnetic Contactor वरती सविस्तर माहिती दिलेल्या लिंक वरती जाऊन वाचू शकता.

4. Vacuum Contactor

Switching करताना arc तयार होऊ नये किंवा खूप कमी व्हावा म्हणून vacuum environment मध्ये काम करणारा contactor म्हणजे Vacuum Contactor. यामध्ये contacts vacuum chamber मध्ये असतात, त्यामुळे arc तयार होण्याची शक्यता खूप कमी आसते. यामुळे contactor ची life जास्त असते आणि maintenance कमी लागते.

हा contactor medium voltage systems, power distribution networks आणि high power industrial equipment साठी वापरला जातो. High voltage applications साठी हा खूप safe आणि efficient मानला जातो.

5. Modular Contactor

Compact size, silent operation आणि easy installation साठी design केलेला contactor म्हणजे Modular Contactor. हा प्रामुख्याने residential आणि commercial applications मध्ये वापरला जातो.

Home automation, lighting control, air conditioning systems आणि smart electrical panels मध्ये हा खूप useful असतो. Modular contactor कमी आवाज करतो, DIN rail वर easily install होतो आणि energy efficient operation देतो. त्यामुळे modern buildings मध्ये याचा वापर वाढत चालला आहे.

6. Auxiliary contactor

Main contactor ला support करणारा छोट्या size चा contactor म्हणजे Auxiliary Contactor. हा heavy load directly control करत नाही, पण control circuit मध्ये signal देण्यासाठी किंवा status indication साठी वापरला जातो. main contactor ON आहे की OFF हे कळण्यासाठी किंवा interlocking system मध्ये safety maintain करण्यासाठी auxiliary contactor वापरला जातो. Control logic circuits आणि automation systems मध्ये याची भूमिका खूप महत्वाची असते.

3 Phase Contactor Wiring Diagram

3 Phase Contactor Wiring Diagram

Contactor Main Parts (Components) in Marathi

Contactor हा एक electrical switching device आहे जो heavy load (जसे motors, lighting systems) ON/OFF करण्यासाठी वापरला जातो. खाली आपण प्रत्येक part सविस्तर clear explanation सह पाहनार आहे.

1. Coil

Coil हा contactor चा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि त्याला contactor चे heart असेही म्हटले जाते. जेव्हा coil ला electrical supply दिली जाते तेव्हा त्यामध्ये magnetic field तयार होतो. हा magnetic field पुढील सर्व mechanical movement साठी जबाबदार असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर coil म्हणजे एक electromagnet आहे जो ON झाल्यावर contactor ला operate करतो आणि OFF झाल्यावर system पुन्हा normal स्थितीत आणतो.

2. Core

Core हा साधारणपणे लोखंडाचा (iron) बनलेला असतो आणि coil मुळे तयार झालेला magnetic field योग्य प्रकारे concentrate करण्याचे काम करतो. Core दोन भागांमध्ये विभागलेला असतो fixed core आणि moving core (armature). जेव्हा coil ON होते तेव्हा magnetic force core मधून flow होऊन moving part ला आकर्षित करते. त्यामुळे contactor मध्ये movement होऊन contacts operate होतात.

3. Armature

Armature हा contactor मधील moving part आहे जो core च्या मदतीने काम करतो. Coil ला supply मिळाल्यावर तयार झालेला magnetic field armature ला fixed core कडे खेचतो. यामुळे contacts close किंवा open होतात. Coil OFF झाल्यावर armature spring च्या मदतीने परत आपल्या original position मध्ये येतो. त्यामुळे ON आणि OFF या दोन्ही operations मध्ये armature खूप महत्वाची भूमिका बजावतो.

4. Contacts (NO & NC Contacts)

Contacts हे contactor मधील असे parts आहेत जे current flow control करतात. दोन मुख्य प्रकारचे contacts असतात NO (Normally Open) आणि NC (Normally Closed). NO contacts हे default स्थितीत open असतात आणि coil ON झाल्यावर close होतात, ज्यामुळे load चालू होतो. NC contacts हे default स्थितीत closed असतात आणि coil ON झाल्यावर open होतात. हे contacts electrical circuit मध्ये switching करण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात.

5. Arc Chute

Contactor मध्ये contacts open किंवा close होताना अनेक वेळा spark (arc) तयार होतो. हा arc खूप heat generate करतो आणि contacts ला damage करू शकतो. Arc chute हा part या arc ला control करून तो break करतो आणि सुरक्षितपणे extinguish करतो. हा भाग अनेक plates ने बनलेला असतो जो arc ला लहान भागांमध्ये divide करून त्याचा प्रभाव कमी करतो. त्यामुळे contactor ची life वाढते आणि safety सुधारते.

6. Spring

Spring हा एक साधा पण खूप महत्वाचा mechanical part आहे. Coil OFF झाल्यावर armature ला परत त्याच्या original position मध्ये आणण्याचे काम spring करते. जर spring नसेल तर contactor योग्य प्रकारे reset होणार नाही. त्यामुळे ON-OFF cycle smooth ठेवण्यासाठी spring आवश्यक असतो.

7. Enclosure

Enclosure म्हणजे contactor चा बाहेरील protective cover. हा plastic किंवा insulating material पासून बनवलेला असतो जो internal parts ला dust, moisture आणि accidental touch पासून सुरक्षित ठेवतो. Industrial environment मध्ये protection खूप महत्वाचे असते, त्यामुळे enclosure contactor च्या safety आणि durability साठी आवश्यक असतो.

Difference Between Relay and Contactor

FeatureRelayContactor
PurposeUsed to control low power electrical circuitsUsed to control high power electrical circuits
Load CapacityHandles small current and voltageHandles very high current and voltage
ApplicationElectronic circuits, control systems, automation boardsIndustrial motors, HVAC systems, heavy machinery
SizeSmall and compactLarger and more robust
Switching CapacityLow switching capacityHigh switching capacity
Arc SuppressionUsually minimal or not requiredSpecial arc suppression (arc chute) provided
Number of ContactsFewer contactsMultiple heavy-duty contacts
DurabilityDesigned for light duty operationDesigned for heavy duty and frequent switching
CostGenerally cheaperMore expensive
Usage EnvironmentElectronic and low power control panelsIndustrial and high power electrical panels

FAQ’S

Contactor का वापरला जातो?

Contactor मोठ्या power असलेल्या electrical loads (जसे motors, industrial machines, lighting systems) सुरक्षित आणि automatic पद्धतीने ON-OFF करण्यासाठी वापरला जातो.

Contactor contact welding म्हणजे काय?

Contactor switching करताना high current किंवा जास्त electrical arc तयार झाल्यास contactor चे contacts खूप गरम होतात आणि एकमेकांना चिकटून permanently जुळून राहतात, यालाच contact welding म्हणतात.

Smart contactor म्हणजे काय?

Smart contactor हा advanced type चा contactor आहे, ज्यामध्ये monitoring, remote control आणि fault detection सारखी smart features असतात. तो electrical load फक्त ON-OFF करत नाही, तर current, voltage, temperature यासारखी माहिती track करू शकतो आणि problem आल्यास alert देतो. काही smart contactor mobile app किंवा automation system द्वारे remotely control करता येतात. Industrial automation आणि energy management साठी smart contactor मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

Conclusion

या ब्लॉगमधून आपण Contactor Working Principle In Marathi या विषयावर माहिती घेतली. contactor कसा काम करतो, coil energized झाल्यावर contacts कसे close होतात आणि supply बंद केल्यावर circuit कसा break होतो हे step-by-step पाहिलं.

यासोबतच आपण Types of Contactor In Marathi देखील समजून घेतले, जसे AC, DC, Magnetic, Vacuum, Modular आणि Auxiliary contactor आणि प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या कामासाठी का वापरला जातो हेही पाहिलं.

थोडक्यात सांगायचं तर, contactor हा industrial आणि commercial electrical systems मधील एक essential control device आहे, जो automation, safety आणि efficient power control साठी खूप महत्वाची भूमिका बजावतो. Contactor ची working आणि types नीट समजल्यावर electrical equipment operate आणि maintain करणे अधिक सोपं आणि सुरक्षित होतं.

Leave a Comment