Type of Electrical Power in Marathi | Power Factor In Marathi 2026

Last Updated: 21 March 2026

Electrical Power Information in Marathi: Electrical system बद्दल आपण रोज ऐकतो, पण प्रत्यक्षात electricity मधील power चे वेगवेगळे प्रकार काय असतात हे अनेकांना माहिती नसते. घरात fan, AC, mixer किंवा industry मध्ये motor, transformer चालताना नेमकी कोणती power वापरली जाते? kW, kVAR आणि kVA म्हणजे काय? आणि हे सगळं एकमेकांशी कसं related असतं?

या blog मध्ये आपण Type of Electrical Power in Marathi, Electrical Power in Marathi Electrical, Electrical Power Information in Marathi, Power म्हणजे काय, Active Power, Reactive Power आणि Apparent Power यांचा फरक काय आहे या विषयांची सविस्तर माहिती घेणार आहे. power triangle कसा काम करतो, तसेच practical life मध्ये याचा उपयोग कसा होतो हे सगळं step by step समजून घेऊ.

Tip: हा लेख 21 मार्च 2026 मध्ये अपडेट करण्यात आला असून, यामध्ये नवीन technology आणि real-life उदाहरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.

Type of Electrical Power in Marathi

Electricity वापरताना आपण फक्त device चालत आहे हे पाहतो, पण प्रत्यक्षात electrical system मध्ये power चे वेगवेगळे प्रकार एकत्र काम करत असतात. त्यामध्ये Active Power, Reactive Power आणि Apparent Power हे तीन प्रकार असतात आणि त्यांचा संबंध समजण्यासाठी Power Triangle वापरला जातो. खाली आपण Electrical Power in Marathi आणी Type of Electrical Power in Marathi यांचे तीन प्रकार याबद्दल माहिती पाहनार आहे. Electrical Power माहिती घेत असताना The Basic Principles Of Electricity In Marathi हा विषय नक्की वाचा.

1. Active Power (kW) म्हणजे काय?

Active Power (kW) म्हणजे electrical system मध्ये प्रत्यक्ष काम करणारी power. हीच power electrical energy ला useful work मध्ये convert करते, जसं की bulb प्रकाश देतो, heater उष्णता तयार करतो किंवा motor फिरते. म्हणजेच जी power आपण प्रत्यक्ष वापरतो आणि ज्यामुळे device काम करतं ती Active Power असते.

Active Power ला Real Power किंवा True Power असंही म्हणतात आणि तिची unit kilowatt (kW) आहे. आपल्या घराच्या electricity bill मध्ये जे units मोजले जातात ते Active Power वर आधारित असतात, कारण हीच power प्रत्यक्ष energy consumption दाखवते.

Formula:

Single Phase: P=V×I×cosφP = V \times I \times \cosφ

Three Phase:P=3×V×I×cosφP = \sqrt{3} \times V \times I \times \cosφ

2. Reactive Power (kVAR) म्हणजे काय?

Reactive Power (kVAR) म्हणजे electrical system मध्ये प्रत्यक्ष काम न करता system व्यवस्थित चालण्यासाठी मदत करणारी power. ही power magnetic field तयार करण्यासाठी वापरली जाते, जी motor, transformer, fan सारख्या inductive devices चालण्यासाठी आवश्यक असते. म्हणजेच Reactive Power मुळे device थेट output देत नाही, पण device चालण्याची प्रक्रिया शक्य होते. या विषयावर Capacitor Kay Kaam Karto? या ब्लॉग मध्ये संपुर्ण माहिती तुम्हाला भेटेल.

Reactive Power ला Wattless Power असेही म्हणतात कारण ही power energy मध्ये convert होत नाही. Reactive Power ची unit kilovolt-ampere reactive (kVAR) आहे. जर system मध्ये Reactive Power जास्त असेल तर power factor कमी होतो, त्यामुळे efficiency कमी होते आणि industry मध्ये capacitor bank वापरून Reactive Power control केली जाते.

Formula:

Q=V×I×sinφQ = V \times I \times \sinφ

OrkVAR=kVA×sinφkVAR = kVA \times \sinφ

3. Apparent Power (kVA) म्हणजे काय?

Apparent Power (kVA) म्हणजे electrical system मध्ये supply होणारी एकूण power (total power). ही power म्हणजे Active Power (जी प्रत्यक्ष काम करते) आणि Reactive Power (जी system चालण्यासाठी मदत करते) या दोन्हींचा मिळून बनलेला परिणाम असतो. म्हणजेच electrical supply मधून device ला जी पूर्ण power मिळते तिला Apparent Power म्हणतात.

याची unit kilovolt-ampere (kVA) आहे. Transformer आणि generator ची rating नेहमी kVA मध्ये दिली जाते, कारण त्यांना system मधील total load handle करावा लागतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, electrical system मध्ये वापरली जाणारी एकूण उपलब्ध power म्हणजे Apparent Power.

Formula:

Single Phase:

S=V×IS = V \times I

Three Phase:S=3×V×IS = \sqrt{3} \times V \times I

OrkVA=kW2+kVAR2kVA = \sqrt{kW^2 + kVAR^2}

4. Power Triangle म्हणजे काय?

What Is Power Triangle

Power Triangle म्हणजे electrical system मध्ये असलेल्या Active Power (kW), Reactive Power (kVAR) आणि Apparent Power (kVA) यांच्यातील संबंध समजावून सांगणारा एक right-angle triangle. या triangle base वर Active Power, vertical side वर Reactive Power आणि hypotenuse वर Apparent Power दाखवली जाते. यामुळे system मधील total power कशी विभागली आहे आणि power factor किती आहे हे समजायला सोपं होतं.

Power Triangle च्या मदतीने kVA² = kW² + kVAR² हा संबंध स्पष्ट होतो आणि electrical system ची efficiency कशी आहे हेही समजते. सोप्या भाषेत सांगायचं तर, electrical power चे तीन प्रकार एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे visual पद्धतीने दाखवणारा triangle म्हणजे Power Triangle.

Main Relation:

kVA2=kW2+kVAR2kVA^2 = kW^2 + kVAR^2

Power Factor relation:

Power Factor=cosφ=kWkVAPower\ Factor = \cosφ = \frac{kW}{kVA}

Information About Power Factor In Marathi

Electrical system मध्ये Power Factor (PF) हा खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण तो system किती efficiently power वापरतो हे दाखवतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, supply झालेल्या total power मधून प्रत्यक्ष कामासाठी किती power वापरली जाते याचं ratio म्हणजे Power Factor.

म्हणजेच electrical system मध्ये दोन प्रकारच्या power असतात Active Power (जी काम करते) आणि Apparent Power (total power). Active Power जितकी जास्त आणि total power च्या जवळ असेल तितका Power Factor चांगला समजला जातो. Electrical Power in Marathi या विषयावर आपण डीटेल मधे माहिती घेतलेली आहे.

Power Factor Formula:

Power Factor(PF)=cosφ=Active Power(kW)Apparent Power(kVA)Power\ Factor (PF) = \cosφ = \frac{Active\ Power (kW)}{Apparent\ Power (kVA)}

Power Factor Improvement Methods in Marathi

Power Factor (PF) कमी असणे म्हणजे electrical system मधे energy योग्य पद्धतीने वापरली जात नाही. यामुळे electricity bill वाढतो, losses वाढतात आणि equipment वर अतिरिक्त load येतो. त्यामुळे PF improve करणे हे industry आणि घरगुती दोन्ही स्तरावर खूप महत्त्वाचे आहे. खाली दिलेले methods वापरून आपण सहज Power Factor सुधारू शकतो.

1. Use Capacitor Bank

Capacitor Bank हा Power Factor improve करण्यासाठी सर्वात सोपा आणि जास्त वापरला जाणारा method आहे. Electrical system मधे motors आणि transformers सारखे inductive loads असतात, जे lagging Power Factor तयार करतात. Capacitor reactive power supply करून हा lagging effect कमी करतो आणि PF improve करतो. हा method कमी खर्चात effective result देतो, त्यामुळे industries मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

2. Use Synchronous Condenser

Synchronous Condenser हा एक advanced method आहे, जो मोठ्या industries मध्ये वापरला जातो. यामध्ये synchronous motor no-load condition मध्ये चालवला जातो आणि तो leading reactive power generate करतो. त्यामुळे system मधील lagging Power Factor balance होतो. हा method continuous PF control देतो आणि voltage stability सुद्धा सुधारतो, त्यामुळे heavy industries साठी हा खूप उपयोगी ठरतो. या विषयावरती अधिक माहिती तुम्हाला Synchronous Condenser या ब्लॉगमध्ये भेटेल.

3. Use Phase Advancer

Phase Advancer हा method induction motors साठी वापरली जाते. Induction motor ला चालण्यासाठी lagging current लागतो, ज्यामुळे PF कमी होतो. Phase Advancer rotor ला external excitation देऊन हा lagging current कमी करतो आणि PF सुधारतो. हा method specific applications साठीच वापरला जातो, पण motor efficiency improve करण्यात मदत करतो.

4. Use VFD (Variable Frequency Drive)

आजच्या modern electrical systems मध्ये VFD चा वापर खूप वाढला आहे. VFD motor ची speed control करतो आणि required इतकाच current घेतो. त्यामुळे unnecessary power loss कमी होतो आणि Power Factor आपोआप improve होतो. यामुळे energy saving होते आणि system अधिक efficient बनतो. त्यामुळे industries मध्ये हा method खूप popular झाला आहे. Modern industries मध्ये energy saving साठी VFD working principle समजून घेणे खूप गरजेचे आहे, कारण VFD वापरल्याने Power Factor आणि efficiency दोन्ही improve होतात.

5. Load Management (Proper Load Distribution)

Power Factor कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे improper load distribution. जेव्हा motors overloading मध्ये चालतात किंवा idle equipment चालू ठेवले जाते, तेव्हा PF कमी होतो. योग्य load management केल्यास PF naturally improve होतो. Balanced load ठेवणे आणि unused equipment बंद ठेवणे हा एक simple पण effective उपाय आहे.

6. Use High Power Factor Equipment

आजकाल modern electrical equipment high Power Factor design मध्ये येतात. जुने motors किंवा transformers वापरण्यापेक्षा high efficiency आणि high PF असलेले equipment वापरल्यास system चा overall PF maintain राहतो. हा long-term solution आहे जो additional correction ची गरज कमी करतो.

Difference Between kW, kVAR And kVA

FeaturekW (Kilowatt)kVAR (Kilovolt-Ampere Reactive)kVA (Kilovolt-Ampere)
MeaningActive Power (Real Power)Reactive PowerApparent Power (Total Power)
FunctionDoes actual useful workSupports magnetic field (no real work)Total supplied power in system
Role in SystemRuns equipment (motors, heaters, lights)Maintains voltage and magnetic fieldCombination of kW and kVAR
Energy Consumption Consumed as useful energyNot consumed as useful workRepresents total demand
Unit TypeReal power unitReactive power unitTotal power unit
FormulakW = kVA × cosφkVAR = kVA × sinφkVA = √(kW² + kVAR²)
Measured ByWattmeter / Energy meterVAR meterVoltmeter + Ammeter calculation
Used ForActual load calculation, billingPower factor correctionTransformer & generator rating
Practical ExampleHeater producing heatMotor coil creating magnetic fieldTotal power supplied to motor
RelationUseful powerSupporting powerResultant total power

FAQ’s

Electrical Power आणि Electrical Energy यात फरक काय?

Electrical Power म्हणजे energy किती वेगाने वापरली किंवा transfer केली जाते याचा rate. याची unit Watt (W) किंवा kilowatt (kW) असते. तर Electrical Energy म्हणजे ठराविक वेळेत वापरलेली एकूण power. म्हणजे device किती वेळ चाललं आणि त्या वेळेत किती electricity वापरली याचं मोजमाप म्हणजे Energy. याची unit kilowatt-hour (kWh) असते.

Reactive Power नसल्यावर motor चालू शकते का ?

नाही. Reactive Power नसल्यावर induction motor चालू शकत नाही. कारण motor चालण्यासाठी तिच्या coil मध्ये magnetic field तयार होणं आवश्यक असतं, आणि हा magnetic field तयार करण्यासाठी Reactive Power लागते. जर Reactive Power उपलब्ध नसेल तर magnetic field तयार होत नाही आणि rotor फिरण्यासाठी force मिळत नाही, त्यामुळे motor start होत नाही.

Electrical Power frequency बदलली तर power consumption बदलतो का?

हो, Electrical Power ची frequency बदलली तर power consumption बदलू शकतो. कारण frequency बदलल्यावर motor speed, impedance आणि overall system efficiency बदलते.

Conclusion

या लेखामधून आपण Type of Electrical Power in Marathi या विषयाची संपूर्ण माहिती समजून घेतली. Electrical system मध्ये power फक्त एकच प्रकारची नसते, तर Active Power (kW), Reactive Power (kVAR) आणि Apparent Power (kVA) हे तीन महत्त्वाचे प्रकार एकत्र काम करतात हे आपल्याला कळलं. कोणती power प्रत्यक्ष काम करते, कोणती system चालण्यासाठी मदत करते आणि total supply कशी मोजली जाते हेही स्पष्टपणे समजलं.

सोप्या भाषेत सांगायचं तर, Electrical Power Information in Marathi आणी Type of Electrical Power समजून घेतल्यावर electrical devices आणि industrial system कशी सुरळीत चालते हे स्पष्ट होईल. Power चे प्रकार आणि त्यांचा योग्य balance समजला तर energy saving, cost control आणि system performance सुधारण्यासाठी मोठी मदत होते हाच या लेखाचा मुख्य takeaway आहे.

Leave a Comment