Types of Residual Current Circuit Breaker In Marathi | RCCB Information In Marathi 2026

RCCB Information In Marathi: घरात किंवा ऑफिसमध्ये Electrical Safety खूप महत्त्वाची असते. छोटासा Current leakage झाला तरी Current बसु शकतो. म्हणूनच RCCB (Residual Current Circuit Breaker) हे Safety Device महत्त्वाचं आहे. पण RCCB म्हणजे नेमकं काय? ते कसं काम करतं? आणि त्याचे किती प्रकार असतात? हे खूप लोकांना माहित नसतं.

Types of Residual Current Circuit Breaker In Marathi या ब्लॉगमध्ये आपण RCCB बद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहे. RCCB म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते, प्रत्येक प्रकार कधी वापरला जातो आणि घरात किंवा इमारतीत योग्य RCCB कसा निवडायचा हे सगळं या ब्लॉगमध्ये स्पष्टपणे समजेल. Electrical knowledge जरी तुमचे कमी असले तरीही तुम्हाला हा विषय सहज समजेल.

Types of Residual Current Circuit Breaker In Marathi

RCCB (Residual Current Circuit Breaker) हा एक safety device आहे जो electrical Current leakage झाला की supply बंद करतो आणि आपल्याला electric shock पासून वाचवतो. RCCB चे वेगवेगळे प्रकार आहेत. काही leakage च्या waveform नुसार ठरतात, तर काही wiring system आणि power connection नुसार. त्यामुळे योग्य RCCB type समजून घेणं खूप गरजेचं आहे.

RCCB Types by Detectable Waveform In Marathi

या मध्ये RCCB कोणत्या प्रकारचा leakage current detect करू शकतो हे चेक केल जात. आजकाल घरात आणि industry मध्ये वेगवेगळी electronic devices वापरली जातात, त्यामुळे leakage चे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात.

Type AC RCCB

हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा RCCB आहे. हा फक्त AC leakage detect करतो. घरातले fan, light, heater यांसारख्या simple appliances साठी हा वापरला जातो. जर घरात फार advanced electronic devices नसतील तर हा RCCB उपयोगी ठरतो.

Type A RCCB

हा RCCB Type AC पेक्षा जास्त safe मानला जातो. हा AC leakage सोबत pulsating DC leakage सुद्धा detect करतो. आजकाल washing machine, computer, inverter यांसारखी electronic devices वापरली जातात, हा RCCB त्या डिवाईसला leakage Current पासून Safe ठेवण्याचे काम करतो.

Type B RCCB

हा खूप advanced आणि sensitive RCCB आहे. हा AC, pulsating DC आणि smooth DC leakage सगळं detect करू शकतो. Solar system, EV charging, heavy machines किंवा industry मध्ये याचा जास्त वापर होतो. हा महाग असतो पण protection खूप high level चं देतो.

Type F RCCB

हा modern appliances साठी बनवलेला RCCB आहे. Variable speed motor, inverter AC, advanced electronic machines यामुळे होणारा complex leakage detect करण्यासाठी हा वापरला जातो. Commercial buildings किंवा smart homes मध्ये RCCB चा वापर केला जातो.

RCCB Types by Number of Poles In Marathi

RCCB किती wires किंवा किती phases control करतो हे Poles Types मध्ये ठरवलं जात. म्हणजे RCCB किती connection protect करू शकतो हे यातून ठरतं.

Two Pole RCCB

हा Two Pole RCCB single phase connection साठी वापरला जातो. घरामध्ये phase आणि neutral या दोन wires असतात, त्यामुळे Two pole RCCB वापरला जातो. हा घरासाठी सर्वात common RCCB आहे.

Four Pole RCCB

हा three phase connection साठी वापरला जातो. यात 3 phase आणि 1 neutral असे चार wires असतात. मोठे buildings, factories, commercial places किंवा heavy load असलेल्या ठिकाणी Four pole RCCB वापरला जातो.

RCCB म्हणजे काय?

RCCB (Residual Current Circuit Breaker) हे एक Electrical Safety Device आहे जे घर इमारतीमध्ये current leakage झाला की लगेच power supply बंद करतं. त्यामुळे electric shock, short circuit किंवा आग लागण्याचा धोका कमी होतो.

सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा wiring किंवा appliance मधून current चुकीच्या मार्गाने बाहेर जातो (leak होतो), तेव्हा RCCB ते ओळखतं आणि काही सेकंदातच electricity cut करतं. त्यामुळे shock बसण्याचा धोका कमी होतो.

Also Read Related Article: MCCB Kay Kaam Karto

RCCB कसा काम करतो?

RCCB चे काम खूप Basics principle वरती चालतं जितका current आत जातो, तितकाच current बाहेर यायला हवा. जर यात थोडाही फरक दिसला, तर RCCB लगेच supply बंद करतो.

घरात electricity phase वायरने आत जाते आणि neutral वायरने परत बाहेर येते. RCCB सतत या दोन्ही वायरमधला current मोजत असतो. जर दोन्ही current सारखे असतील तर सगळं ठीक आहे असं समजलं जातं. पण जर wiring खराब असेल, appliance मध्ये fault असेल किंवा कुणाला shock बसत असेल तर काही current बाहेर leak होतो. त्यामुळे phase आणि neutral मधला current equal राहत नाही.

हा imbalance RCCB लगेच ओळखतो आणि काही milliseconds मध्येच power supply बंद करतो. त्यामुळे electric shock, आग किंवा मोठा अपघात टळतो. RCCB Working Principles बद्दल सविस्तर माहिती तुम्ही लिंक वरती क्लिक करून वाचू शकता.

Difference Between MCCB And RCCB

FeatureMCCB (Molded Case Circuit Breaker)RCCB (Residual Current Circuit Breaker)
Main FunctionProtects electrical circuits from overload and short circuitProtects people from electric shock caused by current leakage
Working PrincipleTrips when current exceeds safe limit (overcurrent protection)Trips when there is an imbalance between phase and neutral (leakage protection)
Protection TypeEquipment and wiring protectionHuman safety and shock protection
Detects Leakage CurrentNoYes
Detects OverloadYesNo
Detects Short CircuitYesNo
Typical UseIndustrial panels, heavy load systems, large buildingsHomes, offices, and places where human safety is important
Current RatingHigh current capacity (up to thousands of amps)Lower current capacity (commonly 25A to 100A)
SensitivityLess sensitive to small leakageHighly sensitive to small leakage (like 30mA)
CostUsually more expensive (depends on rating)Generally less expensive
Main PurposeProtect electrical system and equipmentProtect human life from electric shock

घरासाठी कोणत्या sensitivity चा RCCB best असतो?

घरासाठी 30mA sensitivity असलेला RCCB सर्वात Best आणि सुरक्षित मानला जातो. कारण हा थोडस पन current leakage ओळखतो आणि लगेच electricity बंद करतो. त्यामुळे electric shock बसण्याची शक्यता खूप कमी होते.

RCCB चे connection कशे आसते?

Main supply मधून येणारी phase आणि neutral वायर आधी RCCB च्या input ला जोडली जाते, आणि RCCB च्या output मधून त्या पुढे घराच्या wiring किंवा distribution board ला दिल्या जातात. म्हणजे वीज आधी RCCB मधून जाते आणि मग घरात येते, त्यामुळे कुठेही current leakage झाला तर RCCB लगेच supply बंद करतो.

RCCB सारखा trip होत असेल तर काय कारण असू शकतं?

RCCB सारखा वारंवार trip होत असेल तर कुठेतरी current leakage होत असेल. Wiring खराब असणं, एखादं appliance fault मध्ये असणं, ओलावा (moisture) किंवा earthing योग्य नसणं ही मुख्य कारणं असू शकतात. कधी कधी जास्त appliances एकाच वेळी चालू असले तरी imbalance होऊन RCCB trip होतो. अशावेळी wiring आणि appliances electrician कडून तपासून घ्याव.

Conclusion

या ब्लॉगमध्ये आपण RCCB म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते हे या टॉपिकवरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. Waveform नुसार Type AC, Type A, Type B आणि Type F RCCB कशासाठी वापरले जातात हे पाहिलं, तसेच connection नुसार Two pole आणि Four pole RCCB मधला फरकही समजून घेतला.

योग्य ठिकाणी योग्य प्रकारचा RCCB वापरला तर electric shock आणि leakage मुळे होणारे अपघात सहज टाळता येतात. त्यामुळे electrical safety साठी RCCB ची माहिती असणं आणि योग्य निवड करणं खूप महत्वाचं आहे.

Leave a Comment