SF6 Circuit Breaker in Marathi: Electrical system मध्ये safety खूप महत्त्वाची असते. खास करून high voltage line किंवा substation मध्ये fault झाला तर लगेच supply बंद करणे गरजेचे असते. यासाठी circuit breaker वापरला जातो. त्यामध्ये SF6 Circuit Breaker हा एक advanced आणि जास्त सुरक्षित आहे.
या ब्लॉगमध्ये आपण SF6 Circuit Breaker Working Principle in Marathi, SF6 gas म्हणजे काय, fault झाल्यावर arc कसा तयार होतो हे आपण step by step पाहणार आहे. हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला SF6 Circuit Breaker in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती मिळेल.
Table of Contents
What is SF6 Circuit Breaker In Marathi
SF6 Circuit Breaker हा एक high voltage circuit breaker आहे जो electrical system मध्ये fault झाल्यावर supply बंद करण्याचे काम करतो. यामध्ये SF6 (Sulphur Hexafluoride) gas वापरली जाते. ही gas arc विझवण्यासाठी (arc quenching) खूप प्रभावी असते. जेव्हा line मध्ये short circuit किंवा कोणताही fault होतो, तेव्हा circuit breaker चे contacts वेगळे होतात त्या वेळी arc तयार होतो. हा arc जर लगेच बंद केला नाही तर equipment खराब होऊ शकतात. SF6 gas हा arc पटकन थंड करतो.
सोप्या भाषेत सांगायचं तर, SF6 Circuit Breaker म्हणजे असा breaker जो आतमध्ये gas वापरून मोठ्या voltage आणि current ला control करतो. हा breaker जास्त करून substation, power plant, आणि transmission line मध्ये वापरला जातो कारण तिथे voltage खूप जास्त असते.
SF6 Circuit Breaker Working Principle in Marathi
खाली SF6 Circuit Breaker Working Principle in Marathi या विषयाची अधिक detail आणि step-by-step माहिती दिली आहे.
Normal Operating Condition
Normal condition मध्ये circuit breaker चे fixed contact आणि moving contact एकमेकांना जोडलेले असतात. त्यामुळे current आरामात flow होत असतो. Breaker च्या आत पूर्ण chamber मध्ये SF6 gas योग्य pressure ने भरलेली असते.
या वेळेस gas फक्त insulating medium म्हणून काम करते. तिची dielectric strength जास्त असल्यामुळे contact मध्ये छोटा gap असला तरी current leak होत नाही.
Fault Occurrence and Relay Operation
जेव्हा line मध्ये short circuit, earth fault किंवा heavy overload होतो, तेव्हा current अचानक खूप वाढतो. हा abnormal current protective relay detect करतो. Relay लगेच trip signal breaker ला पाठवतो.
हा signal मिळताच breaker चा operating mechanism (spring type किंवा pneumatic system) active होतो. संपूर्ण process काही milliseconds मध्ये सुरू होते कारण high voltage system मध्ये speed खूप महत्त्वाची असते.
Contact Separation and Arc Formation
Breaker operate झाल्यावर moving contact fixed contact पासून वेगळे होतात. पण current लगेच zero होत नाही. Contacts वेगळे होताना त्यांच्या मध्ये high temperature चा electric arc तयार होतो.
हा arc साधारण 5000°C ते 20000°C तापमानाचा असू शकतो. जर हा arc लगेच विझवला नाही तर contact damage होऊ शकतो किंवा system मध्ये मोठे नुकसान होऊ शकते.
Arc Quenching by SF6 Gas
Contacts वेगळे होताच specially designed arc chamber मध्ये high pressure ने SF6 gas arc वर blast केली जाते.
- Eelectronegative gas आहे (free electrons शोषून घेते).
- Arc मधील ionized particles neutral करते.
- High cooling property मुळे arc चे तापमान पटकन कमी करते.
यामुळे arc लवकर तुटतो आणि current flow पूर्ण थांबतो. AC system मध्ये current natural zero point ला पोहोचतो तेव्हा SF6 gas त्याला पुन्हा सुरू होऊ देत नाही. यालाच effective arc quenching म्हणतात.
Dielectric Recovery and Insulation Strength
Arc विझल्यानंतर contact मध्ये gap तयार होतो. त्या gap मध्ये SF6 gas लगेच strong insulation तयार करते. याला dielectric recovery म्हणतात. SF6 ची dielectric strength air पेक्षा साधारण 2 ते 3 पट जास्त असते. त्यामुळे re-striking (arc पुन्हा तयार होणे) टळते.
Read Related Article: Working Principle of Motor Protection Circuit Breaker
Types of SF6 Circuit Breaker in Marathi
SF6 Circuit Breaker हा high voltage system मध्ये वापरला जाणारा एक महत्त्वाचा circuit breaker आहे. यामध्ये arc विझवण्यासाठी SF6 (Sulphur Hexafluoride) gas वापरली जाते. Design आणि working पद्धतीनुसार SF6 Circuit Breaker चे काही वेगवेगळे types असतात. खाली प्रत्येक type ची माहिती दिली आहे.
1) Single Pressure Type SF6 Circuit Breaker
Single Pressure Circuit breaker मध्ये SF6 gas एकाच pressure मध्ये भरलेली असते. Fault झाल्यावर contact वेगळे होताना हीच gas arc वर blast केली जाते आणि arc विझवते.
यामध्ये gas storage आणि arc chamber वेगळे नसतात. Design साधा असल्यामुळे maintenance कमी लागतो. Modern substation मध्ये हा Circuit Breaker जास्त वापरला जातो कारण तो reliable आणि compact असतो.
2) Double Pressure Type SF6 Circuit Breaker
Double Pressure Circuit Breaker मध्ये pressure level वापरले जातात. एक high pressure chamber आणि एक low pressure chamber.
Normal condition मध्ये gas low pressure मध्ये असते. Fault झाल्यावर high pressure chamber मधील SF6 gas arc वर सोडली जाते. Arc विझल्यानंतर gas पुन्हा low pressure chamber मध्ये जाते.
3) Puffer Type SF6 Circuit Breaker
Puffer Circuit Breaker common आणि modern type आहे. यामध्ये moving contact पुढे-मागे होताना gas ला compress करते. Fault झाल्यावर contact वेगळे होताना piston सारखी रचना SF6 gas ला compress करते आणि ती high pressure ने arc वर blast होते. त्यामुळे arc पटकन विझतो.
यामध्ये वेगळा gas compressor लागत नाही. त्यामुळे design compact, efficient आणि maintenance कमी असतो. आजच्या काळात बहुतेक high voltage system मध्ये Puffer type वापरला जातो.
4. Self-Blast Type SF6 Circuit Breaker
Self-Blast Circuit Breaker arc तयार झाल्यावर त्याच arc च्या उष्णतेमुळे gas expand होतो आणि pressure तयार होतो. हा pressure arc विझवण्यासाठी वापरला जातो. यामध्ये extra mechanical energy कमी लागते. त्यामुळे हा एक energy efficient design मानला जातो.
Applications of SF6 Circuit Breaker in Marathi
SF6 Circuit Breaker हा high voltage system मध्ये वापरला जाणारा एक advanced आणि सुरक्षित circuit breaker आहे. जिथे voltage आणि current खूप जास्त असतो, तिथे normal breaker वापरणे सुरक्षित नसते. अशा ठिकाणी SF6 Circuit Breaker वापरला जातो. खाली त्याचे मुख्य applications दिलेले आहेत.
High Voltage Transmission Lines
Electricity जेव्हा power plant मधून दूरवर पाठवली जाते तेव्हा transmission line मध्ये voltage खूप जास्त (132kV, 220kV, 400kV किंवा त्यापेक्षा जास्त) असतो. अशा वेळी fault झाला तर मोठे नुकसान होऊ शकते.
SF6 Circuit Breaker high voltage सहज handle करू शकतो आणि fault झाल्यावर लगेच supply बंद करतो. त्यामुळे transmission system सुरक्षित राहते.
Electrical Substation
Substation हे power system चे मुख्य control center असते. इथे transformer, busbar आणि इतर मोठी equipment असतात. Fault झाल्यास पूर्ण grid वर परिणाम होऊ शकतो. SF6 Circuit Breaker substation मध्ये protection साठी वापरला जातो कारण तो fast operate होतो आणि arc पटकन विझवतो. त्यामुळे transformer आणि इतर equipment सुरक्षित राहतात. Electrical Substation ची अधिक माहिती तुम्ही Electrical Substation या ब्लॉग मध्ये वाचू शकता.
Power Plants
Thermal power plant, hydro power plant किंवा nuclear power plant मध्ये मोठ्या प्रमाणावर electricity तयार होते. इथे generator आणि transformer high capacity चे असतात. Generator protection साठी SF6 Circuit Breaker वापरला जातो कारण तो high current आणि high voltage दोन्ही handle करू शकतो.
Industrial High Voltage Systems
मोठ्या industries जसे steel plant, cement plant, chemical plant यामध्ये heavy motors आणि high load machines वापरल्या जातात. अशा ठिकाणी sudden fault झाला तर production थांबू शकते आणि नुकसान होऊ शकते. SF6 Circuit Breaker reliable protection देतो आणि system सुरक्षित ठेवतो.
Gas Insulated Substation (GIS)
Modern शहरांमध्ये जागेची कमतरता असते. त्यामुळे compact design असलेले Gas Insulated Substation (GIS) वापरले जाते. GIS मध्ये SF6 gas insulation साठी वापरली जाते आणि त्यातच SF6 Circuit Breaker बसवला जातो. हा system कमी जागेत जास्त safety देतो.
Extra High Voltage (EHV) and Ultra High Voltage (UHV) Systems
ज्या ठिकाणी voltage खूपच जास्त (400kV पेक्षा जास्त) असते, तिथे सामान्य breaker चालत नाही. SF6 Circuit Breaker ची dielectric strength जास्त असल्यामुळे तो EHV आणि UHV system मध्ये सुरक्षितपणे वापरला जातो.
FAQ’s
SF6 Circuit Breaker मध्ये gas leakage कसे ओळखतात?
SF6 gas colorless आणि odorless असतो, त्यामुळे leakage डोळ्यांनी दिसत नाही. Gas leakage ओळखण्यासाठी gas density monitor, pressure gauge किंवा alarm system वापरला जातो. Pressure कमी झाला तर breaker alarm देतो किंवा trip होतो.
SF6 Circuit Breaker मध्ये gas pressure कमी झाला तर काय होते?
Gas pressure कमी झाला तर dielectric strength कमी होते. त्यामुळे breaker operate होऊ नये म्हणून interlocking system बसवलेला असतो. Pressure कमी असल्यास breaker trip किंवा block होतो.
SF6 Circuit Breaker Re-Striking म्हणजे काय?
Arc विझल्यानंतर जर insulation strength कमी असेल तर arc पुन्हा तयार होऊ शकतो. याला re-striking म्हणतात. SF6 gas ची high dielectric strength re-striking टाळण्यास मदत करते.
Conclusion
या ब्लॉगमध्ये आपण SF6 Circuit Breaker Working Principle in Marathi या विषयावर डिटेल माहिती समजून घेतली. Fault झाल्यावर contacts वेगळे होतात, arc तयार होतो आणि SF6 gas त्या arc ला पटकन विझवते ही संपूर्ण process आपण step-by-step पाहिली. तसेच SF6 gas ची dielectric strength जास्त असल्यामुळे high voltage system मध्ये तो किती सुरक्षित आणि reliable आहे हेही समजले.
यासोबतच आपण Types of SF6 Circuit Breaker in Marathi देखील समजून घेतले. Single Pressure, Double Pressure, Puffer Type आणि Self-Blast Type असे वेगवेगळे प्रकार असले तरी सर्वांचे मुख्य काम एकच आहे fault झाल्यावर arc control करून system सुरक्षित ठेवणे. हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला SF6 Circuit Breaker कसा काम करतो, त्याचे प्रकार कोणते आहेत याची पूर्ण आणि स्पष्ट माहिती मिळाली असेल.











