Last Updated: 19 March 2026
Resistance Information in Marathi: आजच्या काळात घरातली wiring असो, motor असो किंवा electrical appliances सगळीकडे Resistance हा खूप महत्त्वाचा घटक आहे. पण खरंच Resistance म्हणजे काय? आणि तो electrical circuit मध्ये काय काम करतो? “What Is Resistance in Marathi” या लेखात आपण resistance ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे.
या ब्लॉगमध्ये आपण Resistance म्हणजे काय, त्याची unit (Ohm), formula, आणि तो current वर कसा परिणाम करतो हे समजून घेऊ. Earth Resistance Multimeter ने कशी measure करायची, कोणती काळजी घ्यायची आणि योग्य reading कशी ओळखायची हे सुद्धा step-by-step समजावून सांगितले आहे.
Tip: हा लेख 19 मार्च 2026 या तारखेला अपडेट करण्यात आला असून, यामध्ये नवीन माहिती आणि real-life उदाहरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.
Table of Contents
What Is Resistance in Marathi
Resistance म्हणजेच विद्युत प्रवाहाला (Electric Current) होणारा विरोध. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर, जेव्हा आपण एखाद्या वायरमधून current सोडतो तेव्हा तो current सहजपणे पुढे जात नाही. त्या वायरचा material, त्याची जाडी, लांबी आणि तापमान या गोष्टींमुळे current ला थोडासा अडथळा येतो. हाच अडथळा म्हणजे Resistance.
आपण घरात पाण्याची पाइपलाइन बघितली असेल. जर पाइप खूप बारीक असेल तर पाण्याचा flow कमी होतो, आणि पाइप जाड असेल तर पाणी जास्त प्रमाणात वाहते. अगदी हाच नियम electrical circuit मध्ये लागू होतो. वायर बारीक असेल, लांब असेल किंवा material कमी conductive असेल तर resistance जास्त असतो आणि current कमी वाहतो.
How to Measure Earth Resistance With Multimeter
1) Earth Resistance With Multimeter
Technically accurate Earth Resistance मोजण्यासाठी Earth Tester (Megger) वापरला जातो. पण basic checking साठी Digital Multimeter उपयोगी पडतो. Multimeter ने आपल्याला exact 3-point test मिळत नाही, पण earth connection proper आहे का, wire तुटलेली आहे का, loose contact आहे का याचा practical अंदाज मिळतो.
2) Safety Precautions Before Testing
Testing सुरू करण्यापूर्वी Main Supply OFF करणे अत्यावश्यक आहे. Live circuit वर Ohm mode वापरू नये, अन्यथा Multimeter damage होऊ शकतो. Rubber gloves वापरा, हात कोरडे ठेवा आणि probes नीट insulated असावेत. Safety ही first priority आहे especially earthing test करताना.
3) Setting Multimeter to Ohm Mode
Multimeter ला Ω (Ohm) mode मध्ये set करा. जर Auto Range Multimeter असेल तर तो स्वतः range select करेल. Manual range असल्यास 200Ω किंवा suitable low range निवडा, कारण Earth Resistance कमी Ohm मध्ये असतो.
4) Step-by-Step Measurement Process
एक earthing wire किंवा earth electrode ला लावा. दुसरा neutral bar किंवा known good ground point ला लावा. Connection firm आणि clean असावा. आता display वर येणारी reading observe करा. जर reading कमी Ohm मध्ये (उदा. 1Ω ते 5Ω) दिसली तर earthing acceptable आहे. Reading खूप जास्त (10Ω, 20Ω किंवा अधिक) असेल तर earth resistance जास्त आहे आणि earthing system improve करण्याची गरज आहे.
5) Understanding the Reading
जर display वर “OL” किंवा infinite दाखवत असेल तर circuit open आहे म्हणजे earth wire तुटलेली, loose किंवा disconnected असू शकते. जर reading fluctuate होत असेल तर contact point साफ करा आणि पुन्हा test करा. Stable आणि low reading म्हणजे good earthing. Industrial standard मध्ये 1Ω पेक्षा कमी resistance ideal मानला जातो.
6) Limitations of Multimeter Method
Multimeter method ही basic checking साठी आहे. Accurate measurement साठी 3-point किंवा 4-point method वापरून Earth Tester ने test करणे आवश्यक असते. Professional testing मध्ये auxiliary spikes वापरले जातात आणि soil resistivity सुद्धा consider केली जाते. त्यामुळे critical installations (factory, hospital, data center) मध्ये proper Earth Testing केली जाते.
What Is the Si Unit of Resistance
Resistance ची SI Unit म्हणजे Ohm (Ω). Electrical circuit मध्ये current ला जो विरोध होतो त्याचे मोजमाप आपण Ohm मध्ये करतो. SI Unit म्हणजे International System of Units जगभरात मान्य असलेली measurement system. त्यामुळे resistance कुठेही मोजला तरी त्याची unit एकच असते, ती म्हणजे Ohm.
Ohm हे नाव प्रसिद्ध शास्त्रज्ञ Georg Simon Ohm यांच्या नावावर ठेवले आहे. त्यांनीच Ohm’s Law दिला. Ohm चे symbol Ω (Omega) असे आहे. Multimeter मध्ये resistance measure करताना आपण Ω चिन्ह पाहतो. Resistance खूप कमी असेल तर milliohm (mΩ) वापरतात, आणि खूप जास्त असेल तर kilo-ohm (kΩ) किंवा mega-ohm (MΩ) वापरतात. Ohm’s Law बद्दल डीटेल माहिती तुम्हाला Ohm’s Law Information In Marathi या ब्लॉग मध्ये भेटेल.
Types of Resistance In Marathi

Electrical field मध्ये Resistance हा खूप महत्त्वाचा विषय आहे. Resistance म्हणजे current ला होणारा विरोध हे आपण आधीच समजून घेतले आहे. पण सगळे resistance सारखे नसतात. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आणि material नुसार resistance चे प्रकार बदलतात. आता आपण या पोस्टमध्ये खाली Types of Resistance In Marathi या विषयावर माहिती घेऊ.
1. Fixed Resistor
Fixed Resistance म्हणजे ज्याची value कायम एकसारखी राहते तो resistance. एकदा तयार केल्यावर त्याची Ohm value बदलत नाही. उदाहरणार्थ, 10Ω, 100Ω, 1kΩ असे resistor electronics circuit मध्ये वापरले जातात. TV, radio, charger, motherboard यांसारख्या devices मध्ये fixed resistor मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
2. Internal Resistance
Internal Resistance हा battery, cell किंवा generator च्या आत असलेला resistance असतो. जरी battery 12V ची असली तरी internal resistance मुळे काही voltage drop होते. Load जास्त असेल तर internal resistance चा परिणाम जास्त जाणवतो. त्यामुळे battery health तपासताना internal resistance महत्त्वाचा असतो.
3. Earth Resistance
Earth Resistance म्हणजे earthing system मधून current जमिनीत जाण्यास किती विरोध होतो. Safety साठी earth resistance कमी असणे गरजेचे आहे. Industrial setup मध्ये साधारण 1Ω पेक्षा कमी resistance ideal मानला जातो. Earth resistance जास्त असेल तर shock आणि equipment damage चा धोका वाढतो. Earthing System कशी काम करते हे जाणून घेण्यासाठी [Electrical Earthing All Information In Marathi] हा लेख वाचा
Real Life Example of Resistance in Marathi
आपण रोज वापरत असलेल्या electrical devices मध्ये Resistance खूप महत्वाची भूमिका बजावतो. सोप्या भाषेत सांगायचं तर resistance म्हणजे electric current चा flow control करणारी property. electric heater मध्ये nichrome wire वापरली जाते. या wire चा resistance जास्त असल्यामुळे current flow होताना heat तयार होते आणि heater गरम होतो. त्याचप्रमाणे electric bulb मध्ये tungsten filament असतो, ज्याचा resistance जास्त असल्यामुळे तो गरम होऊन light देतो. म्हणजेच resistance मुळेच heat आणि light तयार होतात.
घरात वापरला जाणारा fan regulator देखील resistance वरच काम करतो. आपण regulator फिरवतो तेव्हा resistance बदलतो, त्यामुळे current कमी-जास्त होतो आणि fan चा speed control होतो. तसेच mobile charger आणि electronic circuits मध्ये छोटे resistors वापरले जातात जे current ला control करून sensitive components ला damage होण्यापासून वाचवतात. electric iron मध्येही resistance element असतो जो current ला heat मध्ये convert करून कपडे press करण्यासाठी उपयोगी पडतो.
Resistance in Human Body
मानवी शरीरामध्येही Resistance असतो, जो electric current चा flow control करतो. आपल्या शरीरात skin, muscles आणि blood यांसारख्या tissues असतात आणि प्रत्येकाचा resistance वेगळा असतो. यामध्ये skin हा main factor आहे dry skin असताना resistance जास्त असतो, त्यामुळे current कमी flow होतो. पण जर skin wet असेल (पाणी, घाम), तर resistance कमी होतो आणि current जास्त प्रमाणात शरीरातून जातो.
Body resistance किती असतो?
Human body resistance स्थिर नसतो, जशे शरीराचे गुणधर्म तसा resistance असतो.
- Dry skin: 1000 ohm ते 100000 ohm (1kΩ – 100kΩ)
- Wet skin: 300 ohm ते 1000 ohm
याचा अर्थ असा की, resistance कमी असेल तर current जास्त flow होतो आणि electric shock जास्त severe होऊ शकतो. म्हणूनच safety साठी body resistance समजून घेणे खूप महत्वाचे आहे.
Non Ohmic Materials Explained in Marathi
Electrical field मध्ये काही materials असे असतात जे Ohm’s Law (V = IR) follow करत नाहीत, त्यांना Non-Ohmic materials म्हणतात. Normal (Ohmic) materials मध्ये voltage वाढला की current proportional वाढतो, पण non-ohmic materials मध्ये हे relation straight नसतं (non-linear). म्हणजेच voltage बदलला तरी current नेहमी same ratio मध्ये बदलत नाही.
हे materials temperature, light किंवा voltage वर depend करून आपला resistance बदलतात. त्यामुळे त्यांचा graph (V-I graph) हा straight line नसून curved असतो. Non-ohmic materials mainly electronics मध्ये वापरले जातात जिथे control आणि switching आवश्यक असतं.
Ohm’s Law follow न करणारे materials
काही common examples बघितले तर समजायला सोपं जातं. Diode हा एक best example आहे. तो current फक्त एकाच direction मध्ये allow करतो, त्यामुळे तो Ohm’s Law follow करत नाही. Filament lamp (bulb) मध्ये filament गरम होत जातो आणि त्याचा resistance सतत बदलतो, त्यामुळे current linear राहत नाही. तसेच Thermistor (temperature sensor) आणि LDR (Light Dependent Resistor) हे materials environment नुसार resistance बदलतात. Diode बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर [Diode Detail information] हा लेख जरूर वाचा.
थोडक्यात, जे materials constant resistance ठेवत नाहीत आणि voltage-current relationship linear नसतो, त्यांना Non-Ohmic materials म्हणतात. हे materials modern electronics मध्ये खूप महत्वाचे आहेत कारण ते smart control आणि sensing साठी वापरले जातात.
Difference Between Resistance vs Resistivity
| Basis of Comparison | Resistance (R) | Resistivity (ρ) |
|---|---|---|
| Meaning | Resistance म्हणजे एखाद्या conductor मधून वाहणाऱ्या electric current ला होणारा विरोध. | Resistivity म्हणजे त्या material चा intrinsic (स्वतःचा) गुणधर्म जो current ला किती विरोध करतो हे दर्शवतो. |
| Depends On | Length, cross-section area, material आणि temperature वर अवलंबून असतो. | फक्त material आणि temperature वर अवलंबून असतो. Length किंवा size वर अवलंबून नसतो. |
| Formula | R = ρ × (L / A) | ρ = R × (A / L) |
| Symbol | R | ρ (rho) |
| SI Unit | Ohm (Ω) | Ohm-meter (Ω·m) |
| Physical Nature | External factor conductor च्या आकारमानावर बदलतो. | Internal property material चा स्थिर गुणधर्म. |
| Example | लांब वायरचा resistance जास्त असतो. | Copper ची resistivity कमी, Nichrome ची जास्त असते. |
| Practical Use | Circuit मध्ये current control आणि voltage drop साठी वापरला जातो. | कोणता material wiring किंवा heater साठी योग्य आहे हे ठरवण्यासाठी वापरतात. |
FAQ’s
How to Measure Earth Resistance Without Tester in Marathi ?
Multimeter ला Ohm (Ω) mode मध्ये set करा (Main Supply OFF ठेवा). एक probe earth wire ला आणि दुसरा neutral/ground point ला लावा. Reading 1–5Ω असेल तर earthing ठीक, जास्त असेल तर सुधारणा आवश्यक. “OL” दिसल्यास connection loose किंवा तुटलेला असू शकतो. Accurate result साठी Earth Tester गरजेचा आहे.
How to Measure Earth Resistance Using Megger in Marathi ?
Megger मध्ये 3-Point Method वापरतात. Main earth electrode ला E terminal जोडा आणि दोन spikes जमिनीत ठोकून P व C terminals ला connect करा. Test button दाबल्यावर Ohm मधील reading दिसते; 1–5Ω चांगली मानली जाते, जास्त असल्यास earthing सुधारावी लागते.
Why Is Low Earth Resistance Important in Marathi ?
Low Earth Resistance असणे electrical safety साठी खूप महत्त्वाचे आहे, कारण fault किंवा leakage current सुरक्षितपणे जमिनीत वाहण्यासाठी कमी resistance गरजेचा असतो. जर earth resistance जास्त असेल तर MCB किंवा ELCB योग्य वेळी trip होणार नाही आणि shock किंवा equipment damage होऊ शकतो. त्यामुळे सामान्यतः 1–5Ω दरम्यान earth resistance सुरक्षित मानला जातो.
Conclusion
या ब्लॉगमध्ये आपण What Is Resistance in Marathi म्हणजे काय या विषयावर Basic to Advance सगळी माहिती घेतली. Current वायरमधून वाहताना त्याला जो अडथळा येतो तो Resistance असतो, आणि तोच circuit मधील current control करतो. तसेच What Is the Si Unit of Resistance हेही स्पष्ट केले की Resistance ची SI Unit म्हणजे Ohm (Ω) आहे. Ohm’s Law (V = I × R) मुळे voltage, current आणि resistance यांचा संबंध समजतो आणि practical calculation करणे सोपे होते.
याशिवाय आपण Non Ohmic Materials Explained in Marathi बद्दल माहिती घेतली आणि Multimeter वापरून basic checking कशी करायची हे पाहिले. Proper earthing electrical safety साठी किती महत्त्वाची आहे हेही समजले. थोडक्यात, resistance ची theory आणि practical दोन्ही बाजू आपण या लेखातून शिकलो, ज्यामुळे wiring, troubleshooting आणि safety याबाबत आपली समज अधिक मजबूत होते.










