Electrical Current Types In Marathi: Ac Current And Dc Current In Marathi

Last Updated: 29 March 2026

Electrical Current In Marathi: आपण रोज Electricity चा वापर करतो पण “Electricity” म्हणजे नेमकं काय याची कधी माहिती घेतलिये का? फॅन फिरतो, मोबाईल चार्ज होतो, टीव्ही चालतो या सगळ्या क्रियांमागे करंट काम करतो हे तर तुम्हाला माहिती असेल पण कोणता करंट काम करतो हे आपल्याला माहिती नसतं.

Electrical Current चे प्रामुख्याने दोन मुख्य प्रकार असतात. आणि हे दोन्ही Current समजले तर Electrical विषयाचे अर्धे ज्ञान आपोआप भेटते. म्हणूनच या लेखात आपण Electrical Current Types In Marathi या विषयावर अगदी सोप्या, रोजच्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत.

या ब्लॉगमध्ये आपण AC करंट आणि DC करंट म्हणजे काय, ते कसे काम करतात, दोघांमध्ये फरक काय आहे, घरात कोणता करंट येतो, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना कोणता करंट लागतो या सर्व टॉपिकवरती या ब्लॉगमध्ये माहिती घेणार आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिकलचे बेसिक्स एकदाच नीट समजून घ्यायचे असतील, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Tip: हा लेख 29 मार्च 2026 मध्ये अपडेट करण्यात आला असून, यामध्ये नवीन technology आणि real-life उदाहरणे समाविष्ट करण्यात आली आहेत.

Electrical Current Types In Marathi

Electrical Current चे प्रामुख्याने दोन प्रकार असतात:

  • AC (Alternating Current)
  • DC (Direct Current)

घरात येणारा करंट, Motors, पंप, industrial machines यामध्ये AC करंट वापरला जातो. तर मोबाईल, बॅटरी, सोलर पॅनल, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स यामध्ये DC करंट वापरला जातो. या वरुण आपल्याला हे लक्षात येते की रोजच्या जीवनात दोन्ही करंट आपण वापरत असतो.

पुढे या ब्लॉग पोस्टमध्ये आपण AC Current म्हणजे काय, तो कसा काम करतो, Phase आणि Neutral म्हणजे काय, तसेच DC Current म्हणजे काय आणि तो कुठे वापरला जातो ह्या सगळ्या टोपिक्सवरती माहिती समजून घेणार आहोत. एकदा हे स्पष्ट झालं की पुढचे सर्व इलेक्ट्रिकल विषय तुम्हाला अधिक सहज समजतील.

1. AC Current In Marathi (Alternating Current)

AC Current म्हणजे Alternating Current. या करंटमध्ये Current Flow ची दिशा सतत बदलत राहते. म्हणजे करंट कधी Positive तर कधी Negative Direction ला वाहतो. म्हणून त्याला Alternating म्हणजे बदलणारा करंट असे म्हणतात. आपल्या घरात जो करंट येतो तो AC असतो. भारतामध्ये साधारण 230 Volt आणि 50Hz Frequency AC Current पुरवला जातो.

AC करंटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो लांब Distance वरती सहज पोहचवता येतो. वीज निर्मिती केंद्रातून (Power Station) हजारो किलोमीटर दूर असलेल्या शहरांपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी AC करंट वापरला जातो. ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने त्याचे व्होल्टेज कमी-जास्त करता येते, त्यामुळे वितरण सोपे होते. घरातील फॅन, कुलर, फ्रिज, वॉशिंग मशीन, पंप, इंडस्ट्रियल मोटर्स हे सर्व AC Current वर चालतात. AC Current विषयी Advance माहिती What is Alternating Current या आर्टिकलमध्ये वाचू शकता.

1. Phase Wire In Marathi

Phase वायर म्हणजे जिथून करंट प्रत्यक्षात येतो ती वायर. सोप्या भाषेत सांगायचे तर Phase म्हणजे “जिवंत वायर” (Live Wire). या वायरमधून व्होल्टेज पास होते, या वायरमुळेच आपल्या डिवाईसला current मिलतो.

घरातील सॉकेटमध्ये जी वायर स्पर्श केल्यास करंट बसू शकतो ती Phase असते. त्यामुळे Phase वायर नेहमी काळजीपूर्वक हाताळली पाहिजे. स्विच नेहमी Phase लाईनमध्येच लावला जातो, कारण स्विच बंद केला की डिवाईसला जाणारा करंट पूर्णपणे बंद व्हावा.

2. Neutral Wire In Marathi

Neutral वायर म्हणजे करंट परत नेणारी वायर. करंट Phase मधून उपकरणात जातो आणि काम पूर्ण झाल्यावर Neutral मधून परत येतो. म्हणजेच सर्किट पूर्ण करण्याचे काम Neutral करते.

Neutral वायर नेहमी ग्राउंड पोटेन्शियलजवळ असते, त्यामुळे ती Phase वायरच्या तुलनेत सुरक्षित मानली जाते. पण तरीही तिला पूर्णपणे सुरक्षित समजणे चुकीचे आहे. Phase आणि Neutral दोन्ही मिळूनच AC सर्किट पूर्ण होते.

2. DC Current In Marathi (Direct Current)

DC Current म्हणजे Direct Current. या करंटची दिशा बदलत नाही. तो नेहमी एकाच दिशेने वाहतो. त्यामुळे त्याला Direct म्हणजे सरळ करंट असे म्हणतात.

बॅटरी, सेल, सोलर पॅनल आणि USB devices मधून मिळणारा करंट हा DC असतो. मोबाईल, लॅपटॉप, LED लाइट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक सर्किट्स DC वर चालतात. म्हणूनच आपल्या घरात AC पुरवठा असला तरी मोबाईल चार्जर AC ला DC मध्ये बदलतो आणि मगच मोबाईल चार्ज होतो.

DC करंट स्थिर असतो, त्यामुळे तो इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी योग्य असतो. जिथे अचूक आणि स्थिर व्होल्टेजची गरज असते तिथे DC वापरला जातो. Current बद्दल अजून माहिती मिळवायची असेल तर The Basic Principles Of Electricity माझे हे आर्टिकल वाचू शकता.

3. Steady Current In Marathi

Steady Current म्हणजे असा electric current जो वेळेनुसार (time) बदलत नाही. म्हणजेच circuit मधून वाहणाऱ्या current ची value सतत constant राहते. उदाहरणार्थ, जर एखाद्या circuit मध्ये 2 Ampere current सतत वाहत असेल आणि त्यात कोणताही fluctuation नसेल, तर त्याला steady current म्हणतात. हा current stable power supply मध्ये जास्त पाहायला मिळतो.

Steady current चा वापर electronics circuits, battery-operated devices आणि laboratory experiments मध्ये खूप महत्त्वाचा असतो. कारण stable current असल्यामुळे devices नीट आणि सुरक्षितपणे काम करतात. जर current बदलत राहिला, तर components damage होण्याची शक्यता असते, त्यामुळे steady current reliable operation साठी खूप आवश्यक असतो. Steady Current बद्दल आधिक डिटेल माहिती तुम्ही What Is Steady Current in Marathi या ब्लॉग पोस्टमध्ये वाचू शकता.

4. Varying Current In Marathi

Varying Current म्हणजे असा electric current जो वेळेनुसार (time) सतत बदलत राहतो. म्हणजेच current ची value कधी वाढते तर कधी कमी होते. उदाहरण म्हणून AC (Alternating Current) हा varying current चा सर्वात common प्रकार आहे, ज्यामध्ये current ची direction आणि magnitude दोन्ही वेळेनुसार बदलतात.

Varying current चा वापर घरगुती वीजपुरवठा (electric supply), motors आणि transformers मध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. हा current बदलत असल्यामुळे energy transmission सोपी आणि efficient होते. मात्र, काही sensitive electronic devices साठी stable (steady) current आवश्यक असतो, त्यामुळे अशा ठिकाणी rectifier वापरून varying current ला steady current मध्ये convert केले जाते.

AC Ani DC Current Difference In Marathi

PointAC (Alternating Current)DC (Direct Current)
Directionदिशा सतत बदलते (forward–backward)एकाच दिशेने वाहतो
Frequency50Hz (भारतामध्ये)0 Hz (Frequency नसते)
Voltage PatternSine Wave प्रमाणे वर-खाली बदलतोStraight Line प्रमाणे स्थिर असतो
SourceGenerator, Power StationBattery, Cell, Solar Panel
TransmissionLong distance साठी सोयीचाLong distance साठी कठीण
Transformer UseVoltage step-up / step-down सहज करता येतेDirect transformer वापरता येत नाही
ApplicationsFan, Fridge, Motor, PumpMobile, Laptop, LED, Electronics
Stabilityसतत बदलणाराStable आणि constant

FAQ’s

Which Current Is More Dangerous AC or DC In Marathi

AC करंटची दिशा सतत बदलत राहते (50 वेळा प्रति सेकंद). त्यामुळे तो शरीराला लागला तर जबरदस्त झटका बसतो आणि हात वायरपासून सुटत नाही. हृदयावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. DC करंट एकाच दिशेने वाहतो. कमी व्होल्टेजचा DC (जसे 12V बॅटरी) सहसा कमी धोकादायक असतो. पण जास्त व्होल्टेजचा DC सुद्धा धोकादायक असू शकतो.

Which Type of Current Used in Home Marathi

घरात AC Current (Alternating Current) वापरला जातो. वीज निर्मिती केंद्रातून (Power Station) जी वीज आपल्या घरापर्यंत येते ती AC Current स्वरूपात असते. भारतामध्ये साधारण 230V आणि 50Hz असा AC Current पुरवठा दिला जातो. घरातील फॅन, फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, पंप, एसी अशी मोठी उपकरणे AC Current वरच चालतात.

Neutral and Phase Wire Colour In Marathi

Phase (Live) वायरचा रंग साधारण Brown (जुना Red) असतो आणि हिच्यामधून करंट येतो. Neutral वायरचा रंग साधारण Blue (जुना Black) असतो आणि ती करंट परत नेण्याचे काम करते.

Conclusion

या लेखामध्ये आपण Electrical Current Types In Marathi: AC Current And DC Current In Marathi या विषयाची सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती घेतली. Electrical Current प्रवाह म्हणजे काय, तो कसा वाहतो, AC आणि DC करंटमध्ये नेमका काय फरक आहे, तसेच Phase आणि Neutral वायरचे काम काय असते हे आपण समजून घेतले.

सोप्या शब्दात सांगायचे तर, आता आपल्याला Current ही फक्त वायरमधून येणारी गोष्ट नसून तिचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे काम काय आहे हे समजले आहे. AC Current मोठ्या उपकरणांसाठी उपयोगी आहे, तर DC लहान इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी आवश्यक आहे. हे बेसिक ज्ञान लक्षात ठेवले तर पुढे मोटर, ट्रान्सफॉर्मर, इन्व्हर्टर किंवा इतर इलेक्ट्रिकल विषय शिकताना कोणताही गोंधळ होणार नाही.

Leave a Comment